Mumbai Indians IPL 2024 : 22 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरु होत आहे. या स्पर्धेत आयपीएलमधील महत्त्वपूर्ण संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मुंबई इंडियन्स टीमला खेळण्याआधी विश्रांती मिळावी यासाठी पूर्ण ताफा अलिबागमध्ये दाखल झाला आहे. पाहा फोटो...
आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. पहिला सामना शुक्रवारी म्हणजेच 22 मार्च रोजी आरसीबी आणि सीएसकेचे संघ आमनेसामने असणार आहेत.
दरम्यान 5 वेळा आयपीएल चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सची तयारीही जोरात सुरु आहे. यावेळी संघाची कमान हार्दिक पंड्याकडे असणार आहे.
मुंबई इंडियन्स टीमला खेळण्याआधी विश्रांती मिळावी यासाठी पूर्ण ताफा अलिबाग येथे रेडिसन रिसॉर्टमध्ये मंगळवारी (19 मार्च) दाखल झाला आहे. दोन दिवस टिम रिसॉर्टमध्ये राहणार आहेत.
गेटवे येथे बसने मुंबई इंडियन्स टीम दाखल झाली असून त्यानंतर सर्व ताफा पीएनपी जलवाहतूकीने बसून मौज मजा करीत मांडवा येथे दाखल झाले. त्यानंतर बसने टीमही अलिबाग गोंधळपाडा येथील रेडीसन रिसॉर्टमध्ये दाखल झाली.
या रिसॉर्टमध्ये प्रशासनाने टीमचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केल्यानंतर एक दिवस मुंबई इंडियन्स टीमही अलिबागमध्ये रिसॉर्टला राहणार आहे.
त्यानंतर बुधवारी टीम झिराड येथे एका खाजगी फार्म हाऊसवर राहण्यास राहण्यास जाणार आहे. अलिबागमध्ये कर्णधार हार्दिक पांड्यासोबत 52 जणांचा ताफा रेडिसन रिसॉर्टमध्ये दाखल झाले आहेत.
मात्र यांच्या सोबत रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे दोन्ही खेळाडू नव्हते. तसेच मुंबई इंडियन्स टीम रेडीसन रिसॉर्टमध्ये दाखल झाल्यानंतर रिसॉर्टमधील पर्यटकांनी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी लगबग सुरु होती.