Mumbai Local Facial Recognition Cameras: मुंबईतील मशीद, भायखळा, सायन, घाटकोपर, कळवा, मुंब्रा, भिवंडी रोड, डोंबिवली, रे रोड, वाशी, टिळक नगर, चेंबूर, पनवेल, CBD बेलापूर, शिवडी रेल्वे स्थानकांवर हे कॅमेरा बसवण्यात येतील.
Mumbai Local Facial Recognition Cameras:मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेने 117 स्थानकांवर चेहऱ्याची ओळख करणारे 3652 व्हिडिओ सर्व्हिलन्स कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये मुंबई विभागातील 89 स्थानकांचा समावेश आहे. फेस रेकग्निशन सिस्टीम असलेल्या या कॅमेरातून चेहऱ्याचे वेगवेगळे भाग ओळखता येणार आहेत. गुन्हेगाराच्या डोळयातील रेटिना किंवा कपाळ ओळखून, कॅमेरा स्थानकावर उपस्थित असलेल्या गुन्हेगाराची माहिती सुरक्षा एजन्सीला देईल.
सध्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण स्थानकावर एकात्मिक सुरक्षा प्रणाली (ISS) कॅमेरे बसवले आहेत.
परंतु आता मध्य रेल्वेने मुंबई विभागातील 89 स्थानकांवर सुमारे 1200 फेशियल रेकग्निशन कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई उपनगरातील सर्व स्थानकांवर हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. येत्या काही महिन्यांत मुंबईतील सर्व स्थानकांवर हे काम पूर्ण होईल.
रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवण्यासाठी मध्य रेल्वेच्या A, B, C श्रेणीतील 364 स्थानकांवर व्हिडिओ देखरेख असलेले 6122 कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यापैकी 117 स्थानकांवर चेहरा ओळखण्याची प्रणाली असलेले 3652 कॅमेरे असतील. 117 स्थानकांपैकी मुंबई विभागातील 89 स्थानकांचा समावेश आहे.
कॅमेरे बसवण्यासाठी रेल्वे बोर्ड आणि रेलटेल यांच्यात करार झाला आहे. हे कॅमेरे वेटिंग हॉल, रिझर्व्हेशन काउंटर, पार्किंग एरिया, मुख्य प्रवेशद्वार, एक्झिट गेट, प्लॅटफॉर्म, फूट ओव्हर ब्रिज आणि बुकिंग ऑफिसजवळ असतील. हे कॅमेरे 180 अंश ते 360 अंशांपर्यंत व्हिडिओ काढू शकतील.
कॅमेऱ्यातील व्हिडिओ फीड स्थानिक RPF पोस्ट तसेच विभागीय आणि क्षेत्रीय स्तरावर केंद्रीकृत CCTV कंट्रोल रूममधून तपासता येईल. अशा प्रकारे तीन ठिकाणी फीड तपासले जाईल.
पोलीस किंवा इतर कोणत्याही सुरक्षा एजन्सीच्या डेटामधील प्रवाशाचा चेहरा गुन्हेगाराच्या चेहऱ्याशी जुळल्यास, स्थानकावर गुन्हेगाराच्या उपस्थितीची माहिती सुरक्षा एजन्सीपर्यंत पोहोचेल.
-180 डिग्री ते 360 डिग्री पर्यंत व्हिडिओ घेण्यास सक्षम - डोळयातील पडदा, कपाळ आणि चेहऱ्याच्या इतर भागांवरून ओळख पटवली जाईल.
मशीद, भायखळा, सायन, घाटकोपर, कळवा, मुंब्रा, भिवंडी रोड, डोंबिवली, रे रोड, वाशी, टिळक नगर, चेंबूर, पनवेल, CBD बेलापूर, शिवडी