PHOTOS

मुंबईकरांना मिळणार नवीन टर्मिनस, मेट्रोही कनेक्ट होणार; पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकाचा कायापालट

मुंबईमधील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरून भविष्यात प्रवाशांच्या सेवेसाठी ३०० लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत, अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनस उभारण्यात येणार असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे. 

Advertisement
1/7
मुंबईकरांना मिळणार नवीन टर्मिनस, मेट्रोही कनेक्ट होणार; पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकाचा कायापालट
मुंबईकरांना मिळणार नवीन टर्मिनस, मेट्रोही कनेक्ट होणार; पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकाचा कायापालट

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईकरांसाठी 300 लोकल तसंच, वसईत भव्य टर्मिनल उभारले जाणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. 

2/7

केंद्र सरकारने मध्य रेल्वेच्या परळ, एलटीटी, कल्याण आणि पनवेल आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांची प्रवासी क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जोगेश्वरीमध्ये नवे टर्मिनस आणि वसईमध्ये मोठे रेल्वे टर्मिनस उभारण्यात येणार आहे. जोगेश्वरीच्या नव्या टर्मिनसचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. 

3/7

जोगेश्वरीत होणारे टर्मिनस हे मुंबईतील सातवे टर्मिनस आहे. या टर्मिनसचे काम 76 टक्के पूर्ण झाले आहे. तसंच, यामुळं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

4/7

 पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी व राम मंदिरालगतच नवीन टर्मिनस उभारण्यात येणार आहे. येथून वांद्रे आणि मुंबई सेंट्रल येथून अंदाजे 12 लांब पल्ल्याच्या गाड्या स्थलांतरित होऊ शकतात. या टर्मिनन्समुळं उपनगरीय रेल्वे मार्गावरील ताण कमी होणार आहे. 

5/7

 या टर्मिनसवरुन 24 डब्याच्या रेल्वे गाड्यादेखील चालवता येऊ शकतात असे फलाट निर्माण करु  शकतात. खासगी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ असणार आहे. तसंच, पादचारी प्रवाशांसाठी राखीव क्षेत्र असणार आहे. 

6/7

जोगेश्वरी टर्मिनस उभारण्यासाठी 76 कोटींचा खर्च अपेक्षित असणार आहे. राम मंदिराच्या विरार दिशेकडील पादचारी पुलाच्या उतरणीच्या पायऱ्यांची जोडणी जोगेश्वरी टर्मिनलला देण्यात येणार आहे. 

7/7

जोगेश्वरी टर्मिनसमध्ये बेट आणि होम प्रकारचे एकूण 2 प्लॅटफॉर्म आणि 3 मार्गिका या नव्या टर्मिनसमध्ये असणार आहे. त्याचबरोबर, मेट्रो मार्ग 7, मेट्रो मार्ग 2अ, आणि मेट्रो मार्ग 6च्या प्रवाशांना मिळणार लांब पल्ल्याच्या ट्रेन्सपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.





Read More