Mumbai Metro 3 Line Updates: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या मुंबई मेट्रो 3 (Mumbai Metro 3) प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. डिसेंबरपर्यंत ही मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे
राज्यातील पहिली भूमिगत मार्गिका असलेली 'मेट्रो ३' आता संपूर्ण सज्ज झाली आहे. या मार्गिकेतील पहिला टप्पा सुरू करण्यासाठी अत्यावश्यक असलेली अखेरची आणि नववी गाडी अखेर आरे कारशेड परिसरात दाखल झाली आहे.
मुंबई मेट्रो ३ मार्गावर नऊ गाड्या धावणार असून दररोज 160 फेऱ्या होण्याची शक्यता आहे.
मुंबई मेट्रो 3 ही मेट्रोचा पहिला टप्पा आता डिसेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. 'मेट्रो ३' ही उत्तर मुंबईला दक्षिण मुंबईशी पश्चिम उपनगरातून जोडणारी, आरे ते कफ परेड अशी मार्गिका आहे.
३३ किमी लांबीच्या या मार्गिकेवर एकूण २७ स्थानके आहेत. त्यापैकी २६ स्थानके भूमिगत असतील. मार्गिकेचा पहिला टप्पा आरे ते बीकेसी असा असेल.
मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यातील भुयारीकरण 100 टक्के पूर्ण झाले असून स्थानकांची उभारणी 98 टक्के पूर्ण झाली असून चार स्थानके जवळपास सज्ज झाले आहेत.
आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, इंटरनॅशनल एअरपोर्ट, सहार रोड,डोमॅस्टिक एअरपॉर्ट, सांतक्रुझ, विद्यानगरी, बीकेसी, अशी स्थानके पहिल्या टप्प्यात असतील.
'मेट्रो ३'मधील प्रत्येक डब्याची क्षमता ३०० प्रवाशांची आणि गाडीची क्षमता २,४०० ते २,६०० प्रवासी इतकी असेल. डिसेंबर २०२५ पर्यंत या मार्गिकेची दैनंदिन प्रवासीसंख्या १३. लाख इतकी असेल.