Mumbai Water Crisis: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठलाय. त्यामुळे मुंबई महापालिकेने येत्या 5 जूनपासून पाणीकपातीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा वेगानं कमी होतोय. रविवारी हा पाणीसाठा 8 टक्क्यांपेक्षा कमी झाल्याचा पाहिला मिळाला. त्यामुळे आता पाण्यासाठी राखीव साठ्यावरच मुंबईकरांची भिस्त असणार आहे.
सातही धरणांतील पाणीसाठा हा 7.59 टक्क्यांवर आला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात होणार आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये हा सर्वात कमी पाणीसाठा आहे.
मुंबईला पाणी साठ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या तलावातून होतो.
मुंबईला दर दिवशी 3800 दशलक्ष लिटर पाण्याचा साठा लागतो. त्यामुळे या मागणीचा विचार केल्यास एक टक्का पाणी हे मुंबईकरांची तीन दिवसांची मागणी पूर्ण करेल. याचा अर्थ महिन्याला 12 ते 13 टक्के पाणी लागेल.
उन्हामुळे मुंबईकर हैराण असताना पाणीकपाताचं संकट त्यात धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने पावसाची वाट पाहत आहेत. हवामान विभागानुसार जून 10 तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
सात धरण्यातील किती पाणीसाठा आहे ते पाहूयात. उर्ध्व वैतरणा ०००, मोडक सागर 15.57 टक्के, तानसा 26.12 टक्के, मध्य वैतरणा 10.43 टक्के, भातसा 3.33 टक्के, विहार 20.16 टक्के, तुलसी 28.7 टक्के एवढा शिल्लक आहे.
मुंबईत 30 मे पासून 5 टक्के पाणी कपात लागू असताना आता 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. ठाण्यातील काही भागातही 10 टक्के पाणीकपात लागू असणार आहे.