PHOTOS

'BMC मध्ये आपलीच...', '...तर मारा पण..', 'ठाकरेंसोबतच्या युतीबद्दल योग्य...'; राज ठाकरेंच्या 9 सूचना

Raj Thackeray Advice To Party Workers: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज अनेक विषयांवर भाष्य करताना पदाधिकाऱ्यांना 10 अत्यंत महत्त्वाच्या सूचना केल्यात. या सूचना कोणत्या ते पाहूयात...

Advertisement
1/10
अनेक विषयांसंदर्भातील सूचना
अनेक विषयांसंदर्भातील सूचना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा घेतला. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबरच्या युतीपासून ते मराठीच्या मुद्द्यापर्यंत अनेक विषयांसंदर्भातील सूचना केल्या आहेत. राज काय म्हणालेत पादाधिकाऱ्यांना जाऊन घेऊयात 10 मुद्द्यांमध्ये 'मनसे मेळाव्याच्या इन्साईड स्टोरी'मध्ये

2/10
महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा
महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा

महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. 

3/10
आपलीच सत्ता; राज यांचा विश्वास
आपलीच सत्ता; राज यांचा विश्वास

महापालिकेमध्ये आपलीच सत्ता येणार असा विश्वास राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना व्यक्त केला आहे.

4/10
मराठीचा मुद्दा
मराठीचा मुद्दा

मराठीचा मुद्दा घराघरात पोहचवण्याचं काम राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलं आहे.

5/10
कामाला लागण्याचे आदेश
कामाला लागण्याचे आदेश

आपआपसातील हेवे-दावे सोडून कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. 

6/10
उद्धव ठाकरेंचा संदर्भ देत विधान
उद्धव ठाकरेंचा संदर्भ देत विधान

भांडू नका असं सांगताना राज यांनी आम्ही दोन्ही भाऊ 20 वर्षांनी एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडताय असा सवाल राज यांनी विचारला.

7/10
मनसे स्टाइल आंदोलनावरुनही सूचना
मनसे स्टाइल आंदोलनावरुनही सूचना

आपल्या आक्रामक भूमिकांसाठी ओळखला जाणारा पक्ष म्हणून मनसेचा राजकीय वर्तुळात दबदबा आहे. याचसंदर्भात राज यांनी एक महत्त्वाचा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिलाय. 

8/10
...तर मारा; राज यांचे आदेश
...तर मारा; राज यांचे आदेश

कोणी मुजोरी करत असेल तर मारा मात्र उगाच हाणामारी करु नका, असा सल्लाही राज यांनी दिला आहे. 

9/10
प्रतिमा जपण्याचा सल्ला
प्रतिमा जपण्याचा सल्ला

पक्षाच्या प्रतिमेला डाग लागणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला राज यांच्याकडून देण्यात आला आहे. 

10/10
उद्धव यांच्यासोबतच्या युतीबद्दल काय म्हणाले?
उद्धव यांच्यासोबतच्या युतीबद्दल काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीसंदर्भातही राज यांनी पदाधिकाऱ्यांना सूचित केलं आहे. या युतीसोबत योग्य वेळी बोलेन असं ते म्हणाले.





Read More