Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीविहितहानी झालेली नाही.
मुंबईवरुन पुण्याकडे जाताना सोमाटने एक्झिट येथून देहूरोडच्या रस्त्यावरुन वळताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला अन् गाडीने थेट डिव्हाडरला धडक दिली.
चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या डिव्हायडरला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की डिव्हाडरचा पत्रा कारच्या आरपार घुसला.
या कारमध्ये चालक आणि दोन महिला प्रवासी असे एकूण तीन जण प्रवास करत होते. मात्र सुदैवाने या अपघातात कोणाचाही जीव गेलेला नाही.
दरम्यान, शुक्रवारीही झालेल्या एका भीषण अपघातात तिघांना जीव गमवावा लागला होता. भरधाव कारने ट्रकला धडक दिल्याने तिघांचा जीव गेला होता.