PHOTOS

तब्बल दोन दशकांनंतर ठाकरे बंधूंची गळाभेट, तर एकत्र कुटुंबाचा 'तो' क्षण! पाहा भारावून टाकणारे खास PHOTO

Raj-Uddhav Thackeray : ज्या क्षणाची महाराष्ट्रातील जनता वाट पाहत होते, तो क्षण अख्खा देशाने अनुभवला. तब्बल दोन दशकांनंतर म्हणजे 20 वर्षांनंतर मतभेद विसरून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत. 

Advertisement
1/15

 खरं तर मराठी मुद्दा, हिंदी सक्ती आणि त्रिभाषेचा जीआर याविरोधात 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर आले. सरकारने मराठी माणसाची ताकद पाहून त्रिभाषेचा जीआर रद्द केला. त्यामुळे राज - उद्धव ठाकरे मराठी विजय मेळाव्यानिमित्त या दोन भावांची गळाभेट अख्खा देशाने पाहिली. 

 

2/15

यापूर्वीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 24 फेब्रुवारी 2025 मध्ये एका लग्नात भेटले होते. शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात ठाकरे बंधू एकत्र दिसले होते. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्यात. 

 

3/15

या लग्नात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे औपचारिक संवाद साधताना दिसले होते. गेल्या काही महिन्यात कौटुंबिक कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे जवळपास तीन वेळा भेटले. 

4/15

 पण राजकीय व्यासपीठावर राज आणि उद्धव ठाकरे प्रथमच भेटले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वैचारिक मतभेद असल्याने राज यांनी शिवसेनेची साथ सोडली होती. 

 

5/15

18 डिसेंबर 2005 ला राज ठाकरे शिवाजी पार्क जिमखान्यात आले आणि पत्रकार परिषद घेऊन आपण शिवसेनेतून आणि बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडतोय असं सांगितल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला. 

 

6/15

 मी अत्यंत आदरानं सगळ्या गोष्टी केल्या पण मला जे मिळालं ते अत्यंत अपमानास्पद आणि छळणारं आहे. माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्याभोवतीच्या बडव्यांशी आहे, या शब्दात राज ठाकरे यांनी वेदना मांडल्या. 

 

7/15

या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत आली बाजू मांडली. राज यांच्या निर्णय हा गैरसमजाचा परिणाम आहे. त्यांनी 27 नोव्हेंबरला त्यांनी 27 नोव्हेंबर रोजी बंड केलं आणि इतकं दिवस आम्हाला आशा होती की मतभेद सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडवलं जातील. पण 15 डिसेंबर रोजी बाळसाहेब ठाकरेंना भेटल्यानंतरही ते ठाम राहिले.

 

8/15

 शिवसेनेतून आणि काका बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडल्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या समर्थकांसोबत मिळून मनसेची स्थापना केली. मग घोडदौड सुरु झाली ठाकरेंच्या दोन बंधूच्या राजकीय पक्षाची...

9/15

या दुराव्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पहिली भेट दिसून आली 17 जुलै 2012 झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांना छातीत दुखत असल्याने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 

10/15

त्यानंतर हे दोघे भाऊ भेटले ते 10 जानेवारी 2015 ला जहांगीर आर्ट गॅलरीच्या उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला राज ठाकरे आले होते. 

11/15

 त्यानंतर 12 डिसेंबर 2015 मध्येच शरद पवारांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त एकाच व्यासपीठावर भेटले होते. 

12/15

राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे यांचं लग्न 27 जानेवारी 2019 मध्ये झालं तेव्हा उद्धव ठाकरेसह कुटुंब उपस्थितीत होते. 

13/15

पुढे ही भेट 28 नोव्हेंबर 2019 मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा या सोहळ्याच्या वेळी राज ठाकरे उपस्थितीत होते. 

14/15

 यानंतर ही भेट 23 जानेवारी 2019 मध्ये बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात झाली. 

15/15

पुढे 22 डिसेंबर 2024 मध्ये राज ठाकरेंची बहीण जयजयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात राज - उद्धव ठाकरेंची भेट झाली. 





Read More