PHOTOS

मुंबईच्या तापमानात मोठी वाढ, उष्णतेपासून वाचण्यासाठी मुंबईकरांनो अशी घ्या काळजी

मुंबईच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे. जाणून घ्या सविस्तर 

Advertisement
1/7

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुपारच्या वेळेत नागरिक घामाच्या धारांमुळे प्रचंड अस्वस्थ होत आहे. 

2/7

अशा वातावरणात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिण्याची गरज आहे. पाणी कमी पिल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

3/7

वातावरणातील बदलामुळे अनेक ठिकाणची उष्णता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे कठीण झाले आहे.

4/7

तापमानात वाढ झाल्यामुळे डिहायड्रेशन, चक्कर येणे, हातपाय दुखणे, पोटात मळमळणे, मूत्रविकाराच्या समस्या, किडनी स्टोन, उलट्या, जुलाब अशा त्रासाने अनेक जण त्रस्त आहेत.   

5/7

त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नये असं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं आहे. अशातच डिहायड्रेशन आणि पोटाच्या विकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात अढळून येत आहेत. 

6/7

उष्णतेपासून वाचण्यासाठी दिवसभरात 2-3 लिटर पाणी प्यावे. त्यासोबतच नारळपाणी, ताक, दही लस्सीचे सेवन करावे. 

7/7

त्याचबरोबर ताज्या फळाचा ज्यूस घ्यावा. रस्त्यावरचे पाणी, सरबत हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. ते पिऊ नये. त्या ऐवजी घरामध्ये लिंबू पाणी प्यावे. जर चक्कर येत असेल तर ओआरएसचे पाणी प्यावे.  (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)





Read More