Mumbai Metro Line 3 : पहिल्याच पावसात मुंबईतील भुयारी मेट्रोची पोलखोल झालीये. पावसामुळे भुयारी मेट्रो स्थानकाला गळती लागली. मेट्रो स्थानकात अक्षरश:धबधबे वाहत असल्याचं चित्र दिसत होते.
राज्यासह मुंबईतही मान्सून (Mumbai Rains Updates) वेळीआधी दाखल झाल्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. त्यात मुंबईत मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी पाहिलं मिळालं.
मान्सूनने मुंबईत दाखल होण्याचा रेकॉर्ड देखील मोडून काढला आहे. वरळी भुयारी मेट्रो-3 प्रकल्पाला (Mumbai Rains Aqua Line Metro) पावसाचा फटका बसला आहे. कोट्यावधीचा पैसा पाण्यात गेलायच पाहिला मिळत आहे.
राज्य सरकारकडून अवघ्या काही दिवसांपूर्वीच वरळी ते मरोळ या मार्गिकेचे (Metro Aqua Line) उद्घाटन करण्यात आले होते. पण मुंबईच्या पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोचे कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे.
संपूर्ण मेट्रो स्थानकात पाणी शिरलं आणि चिखलाचं साम्राज्य पसरलं. मेट्रो स्थानकातील सरकते जिने, तिकीट विंडो बंद पडल्या. इतकच नाही तर मेट्रो स्थानकातील वीजपुरवठा खंडित झाल्यानं सर्वत्र अंधार पसरला.
मोठा गाजावाजा करत मुंबईत भुयारी मेट्रो सुरु करण्यात आली. पण पहिल्याच पावसात यामेट्रोची अशी अवस्था झाली. यावर कहर म्हणजे मेट्रोच्या कामाची पोलखोल करणाऱ्या झी 24तासच्या प्रतिनिधींची पोलिसांनी अडवणूक केली.
पोलिसांनी अक्षरश: आमच्या प्रतिनिधीला हाताला धरुन बाहेर काढलं. दर वर्षी पावसाळ्यात मुंबईत रेल्वे, रस्ते सेवा कोलमडते. झी 24 तास मुंबईकरांना क्षणाक्षणाची माहिती पुरवतात. मात्र प्रथमच झी 24तासला वृत्तांकन करण्यापासून अडवण्यात आल्याचं पहायला मिळालं.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL)कडून मेट्रो मार्गाची उभारणी करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार यामध्ये मदत केली आहे. आरे जेव्हीएलआर ते बीकेसी असा पहिला टप्पा 7 ऑक्टोबर 2024 ला सुरू झाला होता. हा 12.99 किमी लांबीचा असून यात 10 स्थानकं आहेत.
'अॅक्वा लाइन' म्हणून ओळखली जाणारी ही भुयारी मेट्रो एकूण 33 किमी लांबीची असून यातील धारावी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) हा 9.69 किमी चा टप्पा काही दिवसांपूर्वीच सुरू मुंबईकरांसाठी सुरु करण्यात आला होता.
मेट्रो-3 चे कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ते म्हणाले की, 'मुसळधार पावसाने आचार्य अत्रे चौक स्थानकानजीकची एक संरक्षक भींत कोसळल्याने भुयारी स्थानकात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे, या स्थानकाचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जेथून हे पाणी शिरले तो मार्ग आगमन वा प्रस्थानासाठी वापरण्यात येत नव्हता. तेथे कायमस्वरुपी काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र तुर्तास तेथून पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु होते. हे पूर्ण काम 10 जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता.'
मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस आकाश पूर्ण वेळ ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील आठवड्यात कोकणात सर्वत्र पाऊस पडण्याचा अंदाज आहे.