PHOTOS

दुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात

Weight Loss Tips: दुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात. वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारावरही लक्ष देणे गरजेचे असते. पण अनेकदा कामाच्या गडबडीत जेवणाकडे दुर्लक्ष होते. मग अशावेळी पुन्हा वजन वाढण्याची शक्यता असते. 

Advertisement
1/7
दुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात
दुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात

वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शरिराची हालचाल कमी होते. एकाच स्थितीत बराचवेळी बसून राहिल्यामुळं वजन वाढते. दुपारचे जेवण केल्यानंतर खूपदा झोप येते किंवा आळसावलेले वाटते. अशावेळी या 5 गोष्टी केल्यास तुमचे वजनही नियंत्रणात राहु शकते. 

 

2/7
वेळेवर जेवण करा
वेळेवर जेवण करा

वजन कमी करण्यासाठी वेळेवर जेवण करणे गरजेचे आहे. साधारणतः दुपारी 1 वाजता जेवण करणे हा योग्य वेळ आहे. नाश्ता आणि दुपारचे जेवण यामध्ये 3-4 तासांचे अंतर असणे गरजेचे आहे. तसंच, दुपारच्या जेवणात दही किंवा ताकाचे सेवन केल्यास अन्न लवकर पचण्यास मदत होते. 

3/7
पाणी प्या
पाणी प्या

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असताना स्वतःला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. वजन कमी करण्यासाठी कमीत कमी 3 लीटर पाणी प्यावे. त्यामुळं भुकेवर नियंत्रण राहिल. तुम्ही पाण्याऐवजी नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक यासारखे पेय पिऊ शकता.

4/7
जेवणानंतर एक वॉक घ्या
जेवणानंतर एक वॉक घ्या

दुपारच्या जेवणानंतर लगेच कामाला बसू नका त्यामुळं अन्न नीट पचत नाही. दुपारच्या जेवणानंतर थोडावेळ एक वॉक घ्या. यामुळं दुपारच्या जेवणानंतर जी झोप येते ती समस्या दूर होईल. 

 

5/7
हेल्दी स्नॅक्स खा
हेल्दी स्नॅक्स खा

दुपारच्या जेवणानंतर पण कधी कधी भूक लागते. संध्याकाळी जर भूक लागली तर हेल्दी स्नॅक्स खा. तळलेले पदार्थ जास्त खाऊ नका. 

6/7
ग्रीन टी
ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडट्स आणि आवश्यक खनिजे असतात. त्यामुळं दुपारच्या जेवणानंतर एक तासाने ग्रीन टी प्या. 

7/7

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

 





Read More