Naga Chaitanya - Sobhita Wedding : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची विधी सुरु झाले आहेत. सोशल मीडियावर हळदीचे फोटो व्हायरल झालंय.
नागा चैतन्य आणि शोभिता यांचा साखरपुडा 8 ऑगस्टला झाल्यानंतर त्यांच्याकडे लगीन घाई सुरु झालीय. शोभिताचा घरी दक्षिण भारतीय संस्कृतीत साखरपुडा झाल्यानंतर विधी सुरु झाले होते.
या लग्नविधीची सुरुवात विधीच्या घरी 21 ऑक्टोबरला झाली होती. या सोहळ्याची सुंदर झलक अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली होती. पसुपू डंचदम सोहळ्याचे फोटो तिने शेअऱ केले होते. गजरा, सोन्याचे दागिने आणि हिरव्या बांगड्या घालून शोभिता अतिशय सुंदर दिसत होती.
त्यानंतर आज 29 नोव्हेंबरला शोभिता आणि नागा चैतन्य यांच्या हळदीचा सोहळा पार पडला. शोभिताला नागा चैतन्यच्या नावाची हळद लावण्यात आली. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा हळदी समारंभ त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी हे कपल पारंपारिक लूकमध्ये दिसले. नववधू शोभिताने तिच्या हळदी समारंभासाठी आणि मंगलस्नानम विधीसाठी घातलेल्या दोन पोशाखात अतिशय सुंदर दिसत होती.
शोभिताने हळदीसाठी पिवळ्या रंगाचा सुंदर पारंपारिक पोशाख घातला होता. सोन्याच्या दागिन्यांसह अभिनेत्रीने तिचा लूक खूप खुलून दिसत होता.
हळदी समारंभ पूर्ण केल्यानंतर शोभिता धुलिपाला लाल रंगाच्या साडीत दिसली. ज्यासोबत तिने पूर्ण हाताचा ब्लाउज कॅरी केला होता. तर नागा चैतन्य पांढऱ्या कुर्त्यामध्ये आनंदी दिसत होता.
मीडिया रिपोर्टनुसार नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये सात फेरे घेणार आहेत.
या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या चित्रपटाचे हक्क नेटफ्लिक्सला 50 कोटींना विकलं होतं अशी अफवा पसरली होती. मात्र, नागा चैतन्यने या वृत्ताचं खंडन केलं. झूमशी केलेल्या संभाषणात सांगितलं की, 'ही खोटी बातमी आहे. असा कोणताही करार झालेला नाही.'
नागा चैतन्यचं हे दुसरं लग्न असून 2017 मध्ये सामंथा रुथ प्रभूसोबत लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या चार वर्षांनी 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.