samruddhi mahamarg : तुम्ही कधी स्वत:च्या वाहनानं समृद्धी महामार्गावरून प्रवास केला आहे का?
महाराष्ट्राची भाग्यरेषा असा उल्लेख केल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून दिवाळीच्या दिवसांदरम्यान कार प्रवासाचा एक नवा विक्रम रचला गेला आहे.
नागपूर ते मुंबई-पुणे असा प्रवास (दोन्ही वेळा याच मार्गानं) करण्यासाठी यंदाच्या वर्षी दिवाळीदरम्यान समृद्धी महामार्गाला मोठी पसंती देण्यात आली.
समृद्धी महामार्गावरून 18 नोव्हेंबरला तब्बल 30 हजार 543 कार धावल्या. आतापर्यंत एकाच दिवशी सर्वाधिक कार प्रवास होण्याचा हा विक्रमी दिवस.
दिवाळीत रेल्वे रिझर्वेशनची अडचण, प्रचंड महागलेला विमान प्रवास यामुळे समृद्धी महामार्गाला व्यापारी आणि चाकरमान्यांची पसंती दिली.
ऑक्टोबर महिन्यात 1 ते 21 तारखेपर्यंत 2 लाख 65 हजार 856 कार या मार्गावरून धावल्या.
नोव्हेंबर महिन्यात या कालावधीत म्हणजे 1 ते 21 नोव्हेंबरदरम्यान 3 लाख 82 हजार 416 कार समृद्धीवरून धावल्या आणि एक नवा विक्रम रचला गेला.
अशा या विक्रमी समृद्धी महामार्गावरून तुम्ही कधी प्रवास करताय?