Narali Purnima 2025 Importance in Marathi:नारळी पौर्णिमा आणि समुद्राचे नाते काय? या दिवशी समुद्राची पूजा का केली जाते? हे प्रश्न कधी तुम्हाला पडलेत का? याची उत्तरे जाणून घेऊयात.
Narali Purnima 2025 Importance in Marathi: नारळी पौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. कोळी बांधवांचा मुख्य सण म्हणूनही नारळी पौर्णिमेकडे पाहिले जाते. या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा का करतात, हे जाणून घेऊयात.
महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. विशेषतः किनारपट्टीच्या भागात उत्साहाला उधाण येते. कोळी समाज समुद्राची पूजा करुन हा सण साजरा करतात.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी समाजाकडून नारळ अर्पण केला जातो. तसंच, हो़डीचीदेखील पूजा केली जाते. काही ठिकाणी समुद्राला सोन्याचा नारळदेखील अर्पण केला जातो.
कोळी बांधव हे समुद्राला देव मानतात. समुद्रातूनच त्यांनी अन्न व उपजिनीकेचे साधन मिळते. ते पूर्णपणे समुद्रावर अवलंबून असतात.
नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी पुन्हा सुरू केली जाते. समुद्राला नारळ अर्पण करुन पुन्हा व्यवसाय सुरू केला जातो.
कोळी बांधव खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात. समुद्रात अनेक भयंकर वादळे, लाटा अशा नैसर्गिक आपत्तींपासून त्याचे रक्षण करावे यासाठी ते समूद्राची पूजा करतात.
निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळीबांधव हा सण साजरा करतात. महिला समुद्रदेवाची पूजा करतात. मासेमारीसाठी निघालेल्या आपल्या पतीच्या सुरक्षिततेसाठी त्या समुद्राची मनोभावे पूजा करतात.
नारळी पौर्णिमेला कोळी बांधवाच्या बोटीही छान पताका व रंगरंगोटी करुन सजवल्या जातात. नारळाचा सोन्याचे वेष्टन किंवा पत्रा गुंडाळून विधिवत समुद्राला अर्पण केले जाते. नारळ हा सर्जनशक्तीचे प्रतीक मानले जाते. ओल्या नारळाच्या करंजीचा नैवैद्य बोटीला व समुद्राला दाखवतात. नंतर ही बोट समुद्रात सोडली जाते.