Narali Purnima 2024 Wishes in Marathi : श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी ही नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. काळी बांधवामध्ये या सणाला खूप महत्त्व आहे. यादिवशी कोळी बांधव समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी समुद्रात नारळ अर्पण करतात. अशा या खास दिनाच्या मित्र मैत्रिणींसोबतच प्रियजनांना मराठीतून शुभेच्छा देऊन सण साजरा करा.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती, दर्याराजा शांत होण्यासाठी बांधव प्रार्थना करती.. घराघरात आज नैवेद्याला नारळीभात, सागराला सोन्याचा नारळ अर्पित करून मासेमारीला होते सुरुवात.. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
मान्सूनचा शेवट आणि मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरूवात असणार्या नारळी पौर्णिमेचा दिवस तुम्हांला सुख, शांती समृद्धी घेऊन येवो, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
नारळी पौर्णिमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो, समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हांला सौख्य, मांगल्य देवो नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
दर्या माझ्या भावा कृपा कर मझं वरी खळवळू नको आम्हावरी हीच आमुची मागणी नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
कोळी बांधवांची परंपरा, मांगल्याची, श्रद्धेची, समुद्रदेवतेच्या पूजनाची... नारळी पौर्णिमेच्या कोळीबांधवांना शुभेच्छा!
कोळीवारा सारा सजलाय गो कोळी यो नाखवा आयलाय गो मासळीचा दुष्काळ सरु दे दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा...!
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती, दर्याराजा शांत होण्यासाठी बांधव प्रार्थना करती.. घराघरात आज नैवेद्याला नारळीभात, सागराला सोन्याचा नारळ अर्पित करून मासेमारीला होते सुरुवात.. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!