PHOTOS

PHOTO : रणबीर - शाहिदसोबत अफेयरची चर्चा, उदय चोप्रासोबत 5 वर्षे रिलेशनशीपमध्ये होती 'ही' अभिनेत्री, ₹8800000000 ची मालकीण

Entertainment : आज या अभिनेत्रीचा 45वा वाढदिवस आहे. जीवघेणा आजारपणामुळे रातोरात देश सोडून गेली होती. अगदी दोन वर्ष ती बॉलिवूडमधून गायब होती. आता ती पुनगमन करणार आहे. 

Advertisement
1/13

रॉकस्टारची अभिनेत्री नर्गिसचा जन्म 20 ऑक्टोबर 1979 रोजी न्यूयॉर्कमध्ये मोहम्मद फाखरी आणि मेरी फाखरी यांच्या घरात झाला. पत्नी मेरी फाखरीपासून विभक्त झाल्यानंतर काही वर्षांनी नर्गिसचं वडील मोहम्मद फाखरी यांचे निधन झालं. नर्गिसचे वडील पाकिस्तानी होते आणि अभिनेत्रीकडे अमेरिकन नागरिकत्व आहे, त्यामुळे ती स्वत: ला ग्लोबल सिटिजन म्हणवते.

2/13

नर्गिसने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केल्यानंतर 2004 मध्ये ती अमेरिकेच्या नेक्स्ट टॉप मॉडेलमध्येही दिसून आली. यानंतर नर्गिसने अमेरिकेत मॉडेलिंग केले आणि एजन्सीसाठी फ्रीलान्सिंग सुरु केलं. 

3/13

2009 मध्ये जेव्हा ती किंगफिशर कॅलेंडरमध्ये दिसली तेव्हा नर्गिसला अधिक प्रसिद्धी मिळाली. किंगफिशर कॅलेंडरने चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यानंतर तिने रॉकस्टार चित्रपटासाठी साइन केला. 

4/13

2011 मध्ये नर्गिस फाखरीचा रॉकस्टार हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये ती अभिनेता रणबीर कपूर सोबत दिसली. या चित्रपटात त्याला खूप पसंती मिळाली होती. यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते. यानंतर नर्गिस 'मद्रास कॅफे', 'मैं तेरा हीरो' आणि 'हाऊसफुल 3' सारख्या चित्रपटांमध्येही दिसली.

5/13

नर्गिस फाखरीचं बालपण संघर्षमय होते. याबाबत त्यांनी एका मुलाखतीतही सांगितलं होतं. अभिनेत्री म्हणाली, 'आम्ही न्यूयॉर्कमध्ये तंबूत राहत होतो. दूरवरून पाणी आणावे लागत होतं. अन्न शिजवण्यापासून शौचालयासाठी स्वतः खड्डा खणायचो. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे नर्गिसने लहानपणी अनेक विचित्र नोकऱ्या केल्या होत्या. 

6/13

घरात मदत करण्यासाठी अभिनेत्रीने वृद्ध महिलेचे घर देखील स्वच्छ केलं होतं. तसंच, बर्फवृष्टीनंतर ती रस्त्यावर पडलेला बर्फ काढायची. पण नर्गिसला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. म्हणून, तिने विचित्र नोकऱ्या करून वाचवलेल्या पैशातून त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला आणि ललित कला आणि मानसशास्त्रात पदवी मिळवली. 

7/13

तिच्या लव्ह लाइफबद्दल बोलायचं झालं तर रणबीर कपूर आणि शाहीद कपूरसोबत तिचं नाव जोडल्या गेलं. नर्गिस फाखरी अलीकडेच लिंक-अप अफवांबद्दल बोलली, ती म्हणाली, 'मी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक व्यक्तीशी जोडलेली होती आणि ती मला वेड लावायची.'

8/13

'एकदा एक लेख आला होता ज्यामध्ये असं म्हटलं होतं की मी शाहिद कपूरच्या अपार्टमेंटमध्ये राहिली होती. माझी आईही त्याला भेटायला भारतात आळी. लोक मला मेसेज करून विचारू लागले, तुझी आई शहरात आहे का? आणि माझी आई इथे कधीच आली नाही. त्यामुळे मला या सगळ्याची सवय करून घ्यावी लागली.'

9/13

नर्गिसचे उदय चोप्रासोबतच प्रेम प्रकरण खूप गाजलं होतं. हे अफेयर लग्नापर्यंत गेलं होतं असं म्हटलं जातं. पण दोघांनीही कधीही उघडपणे त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. दोघेही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि त्यांचे ब्रेकअप झाले. वृत्तांवर विश्वास ठेवला तर उदयने नर्गिससोबत व्हॉट्सॲपवर ब्रेकअप केलं होतं. 

10/13

यानंतर, नर्गिस तिच्या ब्रेकअपमुळे उद्ध्वस्त झाल्याची आणि नर्व्हस ब्रेकडाउन झाल्याची बातमी समोर आली होती. असंही म्हटलं जातं की तिच्या ब्रेकअपमुळे ती इतकी नाराज झाली होती की त्याच रात्री ती देश सोडून न्यूयॉर्कला गेली होती. 

11/13

नर्गिसने सांगितलं की, तिला एका जीवघेण्या आजाराने ग्रासले होतं. अभिनेत्रीने सांगितले होते की, 'मला आर्सेनिक आणि शिसे विषबाधा झाली होती. मला काय झाले हे कोणालाही माहिती नव्हतं. हा आजार तुम्हाला अन्न किंवा पाण्याद्वारे कोणत्याही प्रकारे होऊ शकतो. डॉक्टरांनी मला तपासले तेव्हा ते घाबरले कारण या आजाराची पातळी खूप वाढली होती. नर्गिसने सांगितलं की, तिने आयुर्वेदावर आधारित निसर्गोपचाराने उपचार घेतले आणि ती बरी झाली.'

12/13

नर्गिसने 2017 मध्ये अमेरिकन दिग्दर्शक मॅट अलोन्झोला डेट करायला सुरुवात केली होती. दोघे डिसेंबर 2017 पासून एकमेकांना डेट करत होते आणि लॉस एंजेलिसमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र नंतर दोघांचे ब्रेकअप होऊन वेगळे झाले. 

13/13

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या शिव शास्त्री बालबोआ चित्रपटात दिसली होती. आता ही अभिनेत्री हाऊसफुल 5 मध्ये दिसणार आहे. दरम्यान तिची संपत्ती ही 88 कोटींच्या घरात आहे. 





Read More