NASA Perseverance Rover Mars Photos : मंगळ ग्रहावरील जमिनीचे पोटो पाहून म्हणाल हे कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय.... नासाची कमाल... एकदा पाहाच
NASA Perseverance Rover Mars Photos : मंगळ ग्रह हा कायमच संशोधकांसाठी एक अतिशय कुतूहलाचा विषय ठरला असून, याच मंगळ ग्रहावर आजवर प्रत्येक देशातील अंतराळ संशोधन संस्थांनं वेगवेगळ्या मार्गांनी नवनवे शोध लावल्याचं पाहायला मिळालं आहे.
पृथ्वीपासून साधारण 22 कोटी किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या ग्रहाविषयीच्या गूढ रहस्यांची उकल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे ती म्हणजे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था, नासाच्या पर्सिवियरेंस रोवरनं.
नासाच्या पर्सिवियरेंस रोवरनं मंगळावर एकट्यानं प्रवास करत एक वेगळा इतिहास रचला आहे. जिथं डोंगराळ भाग असणाऱ्या असमान पृष्ठावर त्यानं 411 मीटरहून अधितचा प्रवास केला आहे.
नासाचेच क्युरिओसिटी आणि ऑपॉर्च्युनिटी नावाचे रोवरसुद्धा सध्या मंगळावर अस्तित्वात असून, तिथं संशोधन करत आहेत. मात्र, त्यात पर्सिवियरेंस रोवर अधिक सक्षम असल्याचं सांगितलं जातं.
मंगळाशी संबंधित काही कमाल फोटो नासा कायमच समोर आणत असतं, ते पर्सिवियरेंस रोवरच्याच मदतीनं टीपलेले असतात. ज्यानंतर या छायाचित्रांचा अभ्यास आणि विश्लेषण केलं जातं.
1 फेब्रुवारी 2021 मध्ये नासाच्या पर्सिवियरेंस रोवरला जेजेरो क्रेटरमधून लँड करण्यात आलं होतं. मंगळावरील प्राचीन जीवसृष्टीचे संकेत, माती आणि तेथील डोंगरांचे नमुने चाचणीसाठी एकत्रित करणं हे त्याचं मुख्य काम होतं.
हल्लीच पर्सिवियरेंस रोवरनं एक कमाल सेल्फीसुद्धा टीपला होता. जिथं मंगळ ग्रहावरची माती, धूळसुद्धा दिसून आली. ज्यामुळं हा सेल्फी जगभरात गाजला.
आता नासाचा हा पर्सिवियरेंस रोवर भविष्यात आणखी काय किमया करतो हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे, कारण त्यानिमित्तानं कैक मैल दूर असणारा मंगळ अधिकच जवळ भासणार आहे. नाही का.... (सर्व छायाचित्र सौजन्य- नासा)