Space News : अशीच माहिती नुकतीच नासानं समोर आणली. जिथं अवकाशातील एक रहस्य जगासमोर आणलं आहे.
Space News : नासाच्या माहितीनुसार अवकाशातून असे भयाण आवाज आतापर्यंत ऐकले गेले आहेत. की ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल, इतके की घरात एकटं राहण्याचीही भीतीच वाटेल.
नासानं हल्लीच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक प्लेलिस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तुम्ही अवकाशातील आवाज ऐकू शकता.
एखादा भयपट पाहताना वाजणारं पार्श्वसंगीत असतं असगदी तसे किंबहुना त्याहूनही भयाण आवाज अवकाशात होत असतात याचीच प्रचिती ही प्लेलिस्ट ऐकून लक्षात येतं. (आवाज ऐकण्यासाठी इथं क्लिक करा)
असं म्हणतात की अवकाशात मोठी पोकळी आहे. इथं अनेक भागांमध्ये विविध वायू आहेत. जिथं ध्वनीलहरी प्रवास करू शकतात.
नासाकडून सोनिफिकेशनला एका प्लेलिस्टमध्ये रुपांतरित करण्यात आलं आहे. ही संपूर्ण यादी अंतराळ संस्थेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.
नासानं जारी केलेल्या या प्लेलिस्टमध्ये बुध ग्रहापासून गुरु ग्रहापर्यंतचे भयाण आवाज येत आहेत.
तब्बल 250 मैल प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या ब्लॅक होलचा आवाजही इथं येत आहे. तुमच्यापासून दूर असणाऱ्या या विश्वास नेमकं काय सुरुये हे या आवाजांवरूनच कळतंय नाही का...