उत्तर भारतात सध्या लोक प्रचंड उष्णता असल्यामुळे त्रस्त आहेत. मात्र, जगात असे एक ठिकाण आहे तेथील तापमान ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
राज्यात मे महिन्यातच पावसाने हाहाकार केला आहे. अशातच उत्तरेकडून दक्षिण भारतापर्यंत उष्णता शिगेला पोहोचली आहे. तेथील तापमान पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
पृथ्वीवर अत्यंत थंड आणि उष्ण ठिकाणे आहेत. जेथील तापमान आणि थंडी लोकांना आश्चर्यचकित करते. मात्र, नासाने नुकतेच एक नाव सांगितले आहे जेथील तापमान आश्चर्यकारक आहे.
नासाने पृथ्वीवरील सर्वात जास्त उष्ण ठिकाणाचे नाव सांगितले आहे. ते ठिकाण म्हणजे ईरानमधील लूत वाळवंट याला दश्त-ए-लूत या नावाने ओळखले जाते.
नासाच्या अॅक्वा उपग्रहने 2003 ते 2009 पर्यंत येथील तापमानाची नोंद घेतली आहे. ज्यामध्ये येथील तापमान 70.6 अंश सेल्सिअस, म्हणजेच 159 डिग्री फॉरेनहाइट इतके आहे.
लूतचे वाळवंट हे जगातील सर्वात उष्ण ठिकाण आहे. या ठिकाणी जून ते ऑक्टोबर या दरम्यान मोठ्या प्रमाणात उपोष्णकटिबंधीय वारे वाहतात.
हे ठिकाण पर्वतांनी वेढलेल्या आतील भागात आहे. ज्याचे क्षेत्र हे 2,278,015 हेक्टरमध्ये आहे.
हे ठिकाण प्रामुख्याने वाळू, मीठ आणि मोठ-मोठ्या खडकांनी बनलेले आहे. हे ठिकाण जगातील सर्वात उष्ण ठिकाण म्हणून ओळखले जाते.
या ठिकाणचे लोक हे पर्वतीय दऱ्या अशा भागांमध्ये स्थायिक आहेत. या ठिकाणी अनेक खाऱ्या दलदलीचे तलाव आहेत.