Navratri 3nd Day : नवरात्रीचा तिसरा दिवस हा चंद्रघंटा देवीच्या आराधनेचा असतो. नवरात्रीचं तिसरं नातं हे घट्ट मैत्रिणीचं...
नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा देवीची आराधना केली जाते. ही देवी धन, आनंद, ऐश्वर्य, सौभाग्य आणि आरोग्य प्रदान करणारी आहे.
तीचं रूप सौम्य असलं तरी ते दुर्गेचे रूप असल्याने ती वाघावर आरूढ आहे. तिच्या हातात विविध शस्त्र आहेत. अतिशय सुंदर अंगकांती असणाऱ्या या देवीने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे..
शिवाची आराधना करण्यासाठी देवी पार्वती जेव्हा घरातून बाहेर पडली तेव्हा तिच्या आईने, तुझ्या समवेत दोन सख्यांना घेऊन जा, म्हणजे आम्हाला तुझी काळजी राहणार नाही अशी विनंती केली.
मैत्रिणींमधला हा विश्वास लाल रंग दर्शवतो. हा तेजाचा रंग... चैतन्याचा रंग... आपल्या शरीरातील सप्तचक्रांपैकी मुलाधार चक्राचा रंग हि लाल मानला जातो. तसचं प्रेमाचा, विश्वासाचा रंग ही लाल मानला जातो.
म्हणूनच घट्ट मैत्रीण असल्यासारखं भाग्य नाही. मनाचा गोंधळ उडत असेल तर तिला विश्वासाने सांगावं. अडीअडचणीच्या वेळी जिला हक्काने हाक मारावी. खूप आनंदात असताना जिला घट्ट मिठी मारावी, अशी ही मैत्रीण..
या मैत्रीचा कलश विश्वास, आपलेपणा, प्रेम, सचोटी या चौरंगावर शोभून दिसतो.
आजचा दिवस आपल्या घट्ट मैत्रिणीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा मैत्रिचा दिवस