PHOTOS

Navratri 4th Day : बंध नात्यांचे...रंग ऋणानुबंधाचे! नवरात्रीचं चौथ नातं : सासू सूनचं

Navratri 4th Day : नवरात्रीचा चौथा दिवस हा कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. नवरात्रीचं चौथ नातं हे सासू सूनचं...नवरात्रीच्या नऊ दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवस देवाच्या एका रुपाची पूजा केली जाते. तर वारानुसार रंग परिधान केला जातो. 

Advertisement
1/7

देवीच्या उपासकांमध्ये असं मानलं जातं की या जगाची निर्मिती देवीनेच केली आहे. जेव्हा सर्वत्र अंधार होता तेव्हा एक प्रकाश सर्वत्र पसरला, त्या प्रकाशाने नंतर एका देवतेचे रूप घेतलं. तीच ही देवी कुष्माण्डा..

2/7

दुर्गेच्या याच रूपाने नंतर महालक्ष्मी आणि महासरस्वती यांना निर्माण केल. साऱ्या विश्वाची निर्माती म्हणून हिला आदिशक्ती असे म्हणतात.

3/7

झाडाचा कोंब जसं उष्णता, प्रकाश आणि पाणी यामुळे फुटतो... वाढतो, तसं हे ब्रम्हांड विस्तारतं आणि जीवन अस्तित्वात येतं. 

4/7

 त्याच प्रमाणे घरात आलेली गृहलक्ष्मी त्या घराची वंशावळ वाढवते आणि तिला या घरात मायेचं पाठबळ असतं ते तिच्या सासूचं. 

5/7

सासू म्हणते,  लेक माझी लाडाची दिली सासूरा धाडोनी । तहान भागवाया सून आनली प्रेमानी ॥

6/7

आणि सून सांगते..सासू ग गंगामाई हाये निर्मल चांगली ।आईच्या मायेची जणू तहान भागली ॥थोडक्यात काय तर दोघीही माऊली आपल्या निळ्या सावळ्या कृष्णाला, रामाला घडवत असतात.

7/7

निळा रंग म्हणजे आकाश...त्याची लोभस निळाई...निळा रंग म्हणजे समुद्र... त्याची अथांगता...या रंगातच विशालता आहे.





Read More