Navratri Vrat Recipes in Marathi: आता नवरात्री सुरू झाली आहे. नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. या नऊ दिवसांत उपवास केले जातात. या दिवसांत साबुदाणा खिचडी, वरीचा भात, बटाट्याची भाजी असे पदार्थ खावून कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला एका भन्नाट पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत.(फोटोः सोशल मीडियावरुन साभार)
पिठलं आणि भाकरी हा पदार्थ जवळपास सर्वच महाराष्ट्रीयन नागरिकांच्या आवडीचा आहे. मात्र, जर आम्ही तुम्हाला सांगितलं की उपवासाचंही पिठलं बनवता येतं तर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही.
आज आपण पाहूयात उपवासाचं पिठलं आणि भाकरी कशी बनवायची याची रेसिपी. मधुरारेसिपीज या युट्यूब चॅनेलवर ही रेसिपी दाखवण्यात आली आहे. बनवायला सोप्पी आणि चवीलाही खमंग असलेला हा पदार्थ तुम्ही नक्कीच करुन पाहायला हवा.
1 वाटी शेंगदाणा, 1 टेबलस्पून तूप किंवा तेल, जिरे, चवीनुसार तिखट आणि मीठ
शेंगदाणे 2 तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ते मिक्सरमध्ये टाका आणि त्याची बारीक पेस्ट वाटून घ्या.
आता पिठलं बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवा त्यात शेंगदाण्याचे तेल किंवा तूप घाला. तूप चांगले गरम झाले की त्यात जिऱ्याची फोडणी द्या. नंतर त्यात मिरची पावडर घाला.
छान फोडणी बसली की त्यात वाटून घेतलेली शेंगदाण्याची पेस्ट टाका. मिश्रण चांगलं एकजीव करुन घ्या आणि 4 ते 5 मिनिटे वाफवून घ्या नंतर चवीनुसार मीठ टाका. पिठल्यावर छान चमक आली की समजा पिठलं शिजलं आहे.
उपवासाची भाकरी बनवण्यासाठी वरई किंवा भगरीचे पीठ, पाणी आणि मीठ हे साहित्य लागेल. त्यानंतर आपल्या रोजच्या भाकरीसारखी उकड काढून मग भाकरी करुन घ्या.