तुम्हाला हे माहिती का भारतातील रेल्वे प्रवास कुठे संपतो. देशातील शेवटचं स्थानक कुठे आहे? तुम्हाला माहितीये का? आज जाणून घेऊया.
भारतीय रेल्वे ही भारतीयांसाठी अविभाज्य घटक आहे. रेल्वेचे काही स्थानक आणि त्याचा इतिहास हे खूपच रोमाचंक आहेत. काही रेल्वे स्थानक हे देशाच्या सीमेलगत आहेत.
भारतात असं एक रेल्वे स्थानक आहे जिथून तुम्ही पायी चालत गेलात तरी परदेशात पोहोचाल. देशाच्या सीमेवर असलेल्या या स्थानकाबद्दल जाणून घेऊया.
बिहारच्या अररिया जिल्ह्यात आणि पश्चिम बंगालमध्ये असे रेल्वे स्थानक आहेत. अररियाच्या जोगबानी स्थानक यासाठी प्रसिद्ध आहे की इथून उतरून तुम्ही पायी नेपाळची सीमा पर करु शकता. हे स्थानक भारत आणि नेपाळच्या मधील एक महत्त्वपूर्ण स्थानक आहे.
बिहारच्या अररिया जिल्ह्यातील जोगबनी रेल्वे स्थानक नेपाळच्या सीमेजवळून 2 किमीच्या अंतरावर आहे. हे स्थानक इतके जवळ आहे की लोक पायी नेपाळला जाऊ शकता. विशेष म्हणजे भारतीयांना नेपाळला जाण्यासाठी वीजा किंवा पासपोर्टची गरज लागत नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, लोक या स्थानकात उतरून नेपाळला जातात. या प्रमाणेच लोक स्वस्तात नेपाळला फिरायला जाण्याचा प्लान करतात आणि परदेसवारी करतात. तुम्हीदेखील विमान प्रवासाचा खर्च टाळण्याचा प्रयत्न करताय तर हा पर्याय चांगला आहे.
काही मीडिया रिपोर्टनुसार, अररियाच्या या जोगबानी स्थानकापासून नेपाळची सीमा फक्त 2 किमी अंतराहूनही कमी आहे.
तसंच, दुसऱ्या शेवटच्या स्थानकाबद्दल बोलायचे झाल्यास पश्चिम बंगालच्या सिंहाबाद स्थानकदेखील भारताच्या शेवटच्या टोकावर स्थित आहे. दक्षिण भारतातून जिथे समुद्राची सीमा सुरू होते तिथेल स्थानकदेखील भारतातील शेवटचे स्थानक असं म्हटलं जातं.