अभिनेत्री नीना गुप्ता या नेहमी चर्चेत असतात. अशातच त्या पुन्हा एकदा रोमान्सबद्दलच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
अभिनयासोबत बिनधास्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या नीना गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. वयाच्या 66 व्या वर्षी नीना गुप्ता यांनी रोमान्सबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे.
नीना गुप्ता या 'मेट्रो...इन दिनो' या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत काम करणार आहेत. ज्यामध्ये त्या वृद्ध जोडप्याची भूमिका साकारणार आहेत.
अशातच त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी नात्यांबद्दल मत मांडलं आहे. 60-70 वर्षांच्या पुरुष किंवा स्त्रीला रोमान्सची इच्छा नसते असे समजू नका.
भारतीय महिलांनाच फक्त वाटते की आता पुरे झाले. प्रत्येक व्यक्ती स्वप्न बघत असते. परंतु एका विशिष्ट वयानंतर जोडप्याला शारीरिकदृष्ट्या खूप जवळ दाखवता येत नाही.
कारण ते अश्लील दिसते. पण सध्या महिला देखील जीममध्ये जात आहेत. त्या स्वत: फिट ठेवत आहेत. यामध्ये त्यांची काय चूक आहे?
जर एखाद्या दिग्दर्शकाला जुन्या कलाकारांमधील प्रेमसंबंध नैसर्गिक पद्धतीने दाखवायचे असतील तर त्यात काही हरकत नाही. कारण प्रेम वयानुसार जुने होत नाही.
रोमान्स म्हणजे फक्त सेक्स किंवा आकर्षण नाही तर आपल्या पार्टनरबद्दल चांगलं वाटणं, प्रेमाची भावना निर्माण होणं हे आहे असं त्यांनी सांगितलं.
नीना गुप्ता यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यांनी ओटीटीवर देखील वेगळी छाप सोडली आहे.