Neeraj chopra injury update : टोक्यो ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर भालाफेकपटू नीरज चोप्राला आता पॅरिसमध्ये (paris olympics 2024) होणाऱ्या स्पर्धेत पुन्हा एकदा सोनेरी यश संपादन करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
काही दिवसांपूर्वी ओडिशा येथे झालेल्या फेडरेशन कपमध्ये नीरज चोप्रा याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. ऐन पॅरिस ऑलिम्पिकच्या तोंडावर नीरज दुखापग्रस्त झाल्याने भारताला मोठा धक्का बसला.
नीरज चोप्राच्या ॲडक्टर स्नायूंना दुखापत झाली होती, हे स्नायू मांडीच्या आतील भागात असतात. नीरजची तपासणी केली जात असून त्यानंतर रिहॅबिलिटेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
त्यामुळे नीरज चोप्रा पॅरिस ऑम्लिम्पिकमध्ये भाग घेणार की नाही? यावर सस्पेन्स निर्माण झाला होता. अशातच जर्मन कोच क्लॉस बार्टोनिट्सने एक गुड न्यूज दिली आहे.
नीरज चोप्रा ॲडक्टर स्नायूंना दुखापतीतून सावरत असून तो आता बरा आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी नीरज तयारी करत आहे, असं क्लॉस बार्टोनिट्सने सांगितलं आहे.
दरम्यान, सर्वकाही प्लॅननुसार चाललं आहे. सध्या कोणतीही समस्या नाही. मला आशा आहे की, ऑलिम्पिकपर्यंत सर्वकाही असंच राहिल, असं देखील क्लॉस बार्टोनिट्सने म्हटलं आहे.