PHOTOS

'त्यांचे विवाहबाह्य संबंध, पण ते फक्त एका रात्रीसाठीच', नीतू कपूर यांचं ऋषी कपूर यांच्याबाबत मोठं विधान

अभिनेत्री नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्या लग्नानंतर त्यांच्या नात्याची खूप चर्चा रंगली होती. अशातच नीतू यांनी एका जुन्या मुलाखतीत ऋषि कपूरच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल सांगितलं आहे. 

Advertisement
1/8

नीतू कपूर या हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत.त्यांनी कारकिर्दीच्या शिखरावर असताना लग्न करून स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

2/8

ऋषी कपूर यांच्यासोबत त्यांनी लग्न केलं. हे लग्न कपूर कुटुंबाला मान्य होतं. मात्र, नीतू कपूर यांच्या आईला ते मान्य नव्हते. आईला वाटायचे की तिने बॉलिवूड कलाकारासोबत लग्न करू नये. 

3/8

मात्र, दोघांनी अनेक अडचणींवर मात करून 22 जानेवारी 1980 मध्ये लग्न केलं. अशातच नीतू यांनी एका जुन्या मुलाखतीत ऋषी कपूर यांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल सांगितलं आहे. 

4/8

यामध्ये त्यांनी सांगितले की, ऋषी कपूर यांच्या विवाहबाह्य संबंधांवर काही काळानंतर त्यांना कोणतीही अडचण नव्हती. त्यांनी अनेकदा त्यांना इतर महिलांसोबत फ्लर्ट करताना पकडलं होतं. 

5/8

यावर बोलताना नीतू कपूर म्हणाल्या की, पूर्वी मी यावरून खूप त्यांच्यासोबत भांडण करायचे. मात्र, नंतर मी त्यांच्यासोबत वाद घालणं बंद केलं. 

6/8

त्यांच्या अफेअर्सच्या बाबतीत माझा निर्णय बदलला होता. त्यावेळी मी विचार करत होते की ते किती दिवस असे करतात ते बघू. पण मला समजलं त्यांच्यासाठी कुटुंब महत्त्वाचं आहे. 

 

7/8

त्यांचे अनेक अफेअर होती. पण त्याबद्दल मी नंतर कधीच त्यांना विचारलं नाही आणि थांबवलं देखील नाही. कारण ते फक्त एका रात्रीसाठी असायची. 

8/8

ऋषी कपूर हे माझ्यावर जास्त अवलंबून असायचे. त्यामुळे मला माहिती होतं की ते मला कधीच सोडून जाणार नाहीत. बरेच दिवस अफेअर असेल तर मी त्यांना घराबाहेर काढणार होते. तिच्यासोबत राहण्यास सांगणार होते. 





Read More