अभिनेत्री नेहा धुपिया सध्या लोकप्रिय रियालिटी शो रोडीजच्या १० व्या सीजनमध्ये झळकणार आहे. या शो मध्ये नेहा जजची भूमिका निभावणार आहे.
नेहाने अलिकडेच या शोच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोत नेहा आर्मी प्रिंट जॅकेट आणि पिवळ्या रंगाच्या सनग्लासेसमध्ये दिसत आहे. नेहाच्या या जॅकेटची खासियत म्हणजे हे जॅकेट तिला निर्माता-दिग्दर्शन करण जोहरने दिले आहे. नेहाने ही पोस्ट शेअर करत या स्टायलिश जॅकेटसाठी करणचे आभार मानले आहेत.
या शो मध्ये नेहा धुपियासोबत रॅपर रफ्तार, अभिनेता प्रिंस नरुला आणि अंकर निखिल चिनप्पा जज म्हणून दिसणार आहेत. सध्या या शोचे ऑडिशन राऊंड प्रसारीत होत आहेत. लवकरच रोडीज एक्ट्रीमच्या प्रवासाला सुरुवात होईल.
रोडीजशिवाय सेलिब्रेटी चॅट शो बीएफएफ विथ वोगचे सूत्रसंचालन नेहा करत आहे.
नेहाने सांगितले की, माझे एक करिअर असल्याने मी खूप खूश आहे. मी २० वर्षांची असताना ते घडवण्यासाठी मुंबईत आली होती. त्यावेळेस माझ्या वडीलांनी माझे तिकीट बुक केले होते. आणि निघताना ते म्हणाले होते की, मी आशा करतो की तू तीन महिन्यात परत येशील.
नेहाने सांगितले की, तिच्याकडे अजूनही ते तिकीट आहे आणि तिला मुंबईत होऊन १७ वर्ष झाली आहेत. नेहा लवकरच करण जोहरच्या पहिल्या वेब सीरीजमध्ये सहभागी होईल. ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर प्रसारीत होईल. ( सर्व फोटो सौजन्य- @NehaDhupia/Twitter)