PHOTOS

ना रणबीर-आलिया, ना जान्हवी कपूर, हा आहे बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत स्टार किड; एकूण संपत्ती 31,30,000000

बॉलिवूड स्टार किड्सना त्यांच्या कुटुंबामुळे नावारुपाला येतात. बॉलिवूड कुटुंबातून नाही तर बाहेरून आलेले कलाकारांना आपलं अस्तित्व तयार करावं लागतं. खरं तर बॉलिवूडमधील स्टार किड्सची संख्या अधिक आहे. पण यातील सर्वात श्रीमंत स्टार किड्स कोण आहे, तुम्हाला माहितीये का?

 

Advertisement
1/8

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्याचे नाव सर्वश्रुत आहे, पण सर्वात श्रीमंत स्टार किड शाहरुख खानची मुलं सुहाना खान किंवा आर्यन खान नाहीत. तर हिंदी चित्रपटसृष्टीतील तो अभिनेता सर्वात श्रीमंत स्टार किड आहे जो जवळजवळ 2 दशकांपासून इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. 

2/8

जर तुम्हाला आतापर्यंत या स्टार किडचे नाव कळलं नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो. हा दुसरा तिसरा कोणी नसून हृतिक रोशन आहे. या अभिनेत्याने 2000 मध्ये 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्याचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला आणि तरुणींच्या मनावर राज्य करु लागला. 

 

3/8

हृतिक रोशनला त्याचे वडील राकेश रोशन यांनी लाँच केलं होतं. 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून त्याच्या कारकिर्दीची उत्तम सुरुवात केल्यानंतर, हृतिक रोशनने अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आणि खूप प्रसिद्धी मिळवली. त्याची गणना बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांमध्ये केली जाते.

4/8

चित्रपट निर्माते राकेश रोशन यांचा मुलगा आणि संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांचा पुतण्या हृतिक रोशनची एकूण संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे. जीक्यू इंडियाच्या अहवालानुसार, हृतिक रोशनची एकूण संपत्ती 3130 कोटी रुपयांची आहे. त्याने त्याच्या 2 दशकांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्यातून त्याने चांगली कमाई केलीय. 

5/8

कमाईच्या बाबतीत, हृतिक रोशन जान्हवी कपूर, खुशी कपूर, सुहाना खान, आर्यन खान, सनी देओल, बॉबी देओल, रणबीर कपूर, आलिया भट्ट यासारख्या सर्व स्टार किड्सपेक्षा खूप पुढे आहे. हृतिक रोशनकडे कमाईचे अनेक स्रोत आहेत.

 

6/8

चित्रपटांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त, हा अभिनेता त्याच्या कुटुंबाच्या फिल्मक्राफ्ट प्रॉडक्शन हाऊस, त्याच्या फिटनेस आणि लाइफस्टाइल ब्रँड एचआरएक्समधून चांगली कमाई करतो. लोणावळा इथे अभिनेत्याचे फार्महाऊस आणि मुंबईत समुद्रासमोरील बंगला आहे.

7/8

हृतिक रोशनकडे अनेक आलिशान गाड्यांचा संग्रह आहे. त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्यांसह घड्याळांचा संग्रह देखील आहे. हा अभिनेता त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठी देखील ओळखला जातो.

8/8

सध्या हृतिक रोशन त्याच्या क्रिश फ्रँचायझीच्या आगामी चित्रपटात व्यस्त आहे. क्रिश 4 मध्ये मुख्य भूमिका साकारण्यासोबतच, हृतिक रोशन स्वतः त्याचे दिग्दर्शनही करत आहे. यासोबतच तो वॉर 2 मध्येही दिसणार आहे. वॉर 2 मध्ये हृतिक रोशन ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे.





Read More