Nepal Earthquake : स्थानिक वृत्तसंस्था आणि एएनआयनं घटनास्थळाची काही छायाचित्र समोर आणत नेपाळमधील परिस्थिती किती विदारक आहे याचं चित्र जगासमोर आणलं.
Nepal Earthquake : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप आला आणि या भूकंपानं देशातील बहुतांश भाग उध्वस्त केला.
आतापर्यंत नेपाळमधील या भूकंपानं140 हून अधिक नागरिकांचा बळी घेतला. किंबहुना अद्यापही अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक बचाव पथकं आणि यंत्रणांच्या माहितीनुसार जखमींची संख्याही जास्त असून सध्या त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता, जिथं सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
अनेक भागांमध्ये उभीच्या उभी घरं दुभंगली गेली, तर कुठं इमारती कोसळल्या. छायाचित्रांच्या माध्यमातून घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती असेल हे लगेचच लक्षात आलं.
नेपाळमधील बेहरी रुग्णालय, कोहालपूर वैद्यकिय महविद्यालय, नेपालगंज मिनिटरी रुग्णालय, पोलीस रुग्णालय सर्वाधिक क्षतिग्रस्त असल्याचं लक्षात आलं.
सध्याच्या घडीला नेपाळमध्ये हेलिकॉप्टर सुविधा Standby ठेवण्यात आली असून, सर्व विमानसेवा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही काळापासून नेपाळमध्ये भूकंपसदृश परिस्थिती सातत्यानं उदभवत असल्याचं पाहायला मिळालं. यापूर्वी 22 ऑक्टोबर रोजी आलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदूही नेपाळमध्येच असल्याचं सांगण्यात येतं.