PHOTOS

Friendship Day 2025: मैत्री दिनानिमित्त मित्राला देऊ नका कधीही 'हे' 5 गिफ्ट, अन्यथा नात्यात येईल दुरावा

Friendship Day 2025: ऑगस्टमधील पहिला रविवारी 3 ऑगस्ट 2025 ला मैत्री दिन म्हणजे फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येणार आहे. 

Advertisement
1/8
मैत्रीचं सुंदर नातं
मैत्रीचं सुंदर नातं

जगातील सर्वात सुंदर आणि अनमोल नातं हे मैत्रीचं मानलं जातं. मित्र हा आपल्या आयुष्यात सावलीसारखी असते. सुख दु:खात कायम पाठीशी असतो तो सच्चा मित्र. त्यासोबत आपल्यातील वाईट गुणासोबत तो आपलाला स्विकारतो. चुकीच्या रस्त्यावर जाण्यापासून आपल्याला रोखतो. 

2/8
असा मित्र कायम असावा
असा मित्र कायम असावा

मैत्रीचं असं असतं जे रक्ताच्या नात्याशिवाय आपण बनवलं असतं. या नात्याची निवड आपण करतो. मैत्रीचं नातं प्रेम आणि आनंदाचा असतं. त्यात कुठलाही स्वार्थ नसतो. 

3/8
फ्रेंडशिप डे साजरा करताना हे लक्षात ठेवा
फ्रेंडशिप डे साजरा करताना हे लक्षात ठेवा

मैत्रीचं नातं हे कोणासोबत पण असू शकतो. या ना वयाची मर्यादा असते ना कुठल्याही बंधनाची. एक मुलगा आणि मुलगी हेदेखील जगातील सर्वात सुंदर मैत्रीचं नातं असतं. 3 ऑगस्ट 2025 ला मैत्री दिन म्हणजे फ्रेंडशिप डे साजरा मैत्रीच्या नात्यात दुरावे येऊ नये म्हणून मित्राला चुकूनही 5 गोष्टी कधीही भेटवस्तू देऊ नका. 

 

4/8
काळ्या वस्तू
काळ्या वस्तू

काळा रंग हा शोक किंवा नकारात्मकतेचे प्रतीक मानला गेला आहे. फ्रेंडशिप डे सारख्या आनंदाच्या प्रसंगी काळे कपडे, बॅग्ज किंवा अॅक्सेसरीज देऊ नये सांगण्यात आलंय. त्याऐवजी, तुमच्या मित्राच्या चेहऱ्यावर हास्य आणि त्याला आनंद मिळेल असं गिफ्ट द्या. 

5/8
तीक्ष्ण वस्तू
तीक्ष्ण वस्तू

नात्यात दुरावा येऊ नये म्हणून कधीही मित्राला चाकू, कात्री किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू देऊ नका. तीक्ष्ण वस्तू गिफ्ट देणे अशुभ मानले गेले आहे. तसंच अनेक संस्कृतींमध्ये अशा गोष्टी नातेसंबंधात कटुता आणण्याचे प्रतीक मानल्या गेली आहे. 

6/8
तुटलेल्या किंवा जुन्या वस्तू
तुटलेल्या किंवा जुन्या वस्तू

जुन्या किंवा तुटलेल्या वस्तू देणे मैत्रीत अतिशय चुकीच्या आहेत. जरी ती वस्तू तुमच्यासाठी मौल्यवान असली तरी, तुमच्या मित्राला नेहमीच एक नवीन आणि खास भेट द्याला पाहिजे. यामुळे तुमच्या नात्यात प्रेम आणि आदर राहतो.

7/8
घड्याळ
घड्याळ

घड्याळ हे वेळेचे प्रतीक मानले गेले आहे. ते भेटवस्तू देणे मैत्रीचा वेळ मर्यादित करण्याचा संकेत देतात. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की घड्याळ भेटवस्तू दिल्याने नात्यात अंतर निर्माण करते. 

8/8
रिकामी पर्स
रिकामी पर्स

पाकीट किंवा पर्स कधीही रिकामी देऊ नये.रिकामे पाकीट देणे हे आर्थिक अडचणीचे लक्षण मानलं जातं. मैत्री मजबूत करण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. 





Read More