जर तुमच्या कारमध्ये देवाची मूर्ती बसवली असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
देशात अनेक वाहनांच्या डॅशबोर्डवर देवदेवतांच्या मूर्ती किंवा फोटो लावलेले आपल्याला बघायला मिळतात.
लोक देवी-देवतांना आपल्या वाहनात बसवतात आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतात.
वास्तुशास्त्रानुसार, कारमध्ये देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो लावले असतील तर त्या ठिकाणी या चुका करू नयेत.
ज्या कारमध्ये देवाची मूर्ती असेल त्या कारमध्ये दारुचे सेवन कधीच करू नये. असे वास्तूतज्ज्ञांचे मत आहे.
त्यासोबत जर तुमच्या कारमध्ये देवाची मूर्ती असेल तर कारमधील स्वच्छतेची नेहमी काळजी घ्यावी.
कारमध्ये देवाची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या कारमध्ये कधीही मांसाहार करू नये. असे केल्याने पाप लागते.