New Rules From 1st July 2025: तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारे काही नियम आजपासून बदलले आहेत. हे नियम कोणते आणि काय बदल झाले आहेत पाहूयात सविस्तरपणे...
आज म्हणजेच 1 जुलै 2025 पासून नवीन नियम लागू झाले आहेत हे नियम सर्वसामान्यांवर थेट परिणाम करणारे असून मासिक बजेड कोलडेल असे काही नियम यामध्ये आहेत. नेमके काय बदल आजपासून लागू झालेत पाहूयात...
यूपीआयचा नवा नियम : आतापर्यंत कोणत्याही व्यवहारावरील चार्जबॅक दावा नाकारला गेला तर बँकेला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून परवानगी घेतल्यानंतर या प्रकरणाची प्रक्रिया सुरू करावी लागत होती. परंतु 20 जून 2025 रोजी जाहीर झालेल्या नवीन नियमानुसार, बँका आता एनपीसीआयच्या मंजुरीची वाट न पाहता स्वतःहून चार्जबॅक दावे पुन्हा प्रक्रिया करू शकतात. त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.
तत्काळ ट्रेन तिकीट बुकिंगचा नियम बदलला : आज म्हणजेच 1 जुलै 2025 पासून तत्काळ तिकीट बुकिंग नियम बदलणार आहे. आयआरसीटीसी वेबसाइट आणि मोबाईल अॅपवरून तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार पडताळणी आवश्यक असणार आहे. तसेच 15 जुलै 2025 पासून तत्काळ तिकीट बुक करताना ओटीपी देखील टाकावा लागणार आहे.
जीएसटीचाही नियम बदलला : जुलै 2025 पासून जीएसटीआर- 3 बी फॉर्म एडिट करता येणार नाही. याशिवाय आता कोणताही करदाता तीन वर्षांनंतर मागील तारखेचा जीएसटी रिटर्न भरू शकणार नाही.
एचडीएफसी ग्राहकांना फटका : एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डधारकांसाठी नवीन शुल्क आणि रिवॉर्ड पॉलिसीमध्ये बदल केले जात आहेत. आता तुमचा खर्च एका महिन्यात 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त 1 टक्के शुल्क आकारला जाणार आहे.
पॅनकार्डसाठी आधारची सक्ती: नवीन पॅनकार्ड काढायचे असेल तर आधारकार्ड असणे आवश्यक आहे. आतापर्यंत कोणतेही वैध ओळखपत्र आणि जन्म प्रमाणपत्र पुरेसे होते. परंतु सीबीडीटीने 1 जुलै 2025 पासून आधार पडताळणी अनिवार्य केली आहे. त्याचा उद्देश बनावट पॅनकार्ड रोखणे आणि फसवणूक टाळणे आहे.
गॅस झाला स्वस्त: जुलै महिन्याच्या सुरुवातीला सर्वसामान्यांना लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमती कमी केल्या आहेत. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती 58.5 रुपयांनी कमी केल्या असून हे दर आजपासून (1 जुलैपासून) लागू झाले आहेत.
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून विशेष सूट: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15 टक्के सूट मिळणार आहे. ही सवलत 1 जुलैपासून लागू होणार असून, 150 कि.मी. पेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या आणि सवलतधारक प्रवासी वगळून इतर प्रवाशांना ही दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुटीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे.
रेल्वे प्रवास महागला: भारतीय रेल्वेच्या तिकीट दरांमध्ये 1 जुलै 2025 पासून देशभरातील लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील द्वितीय श्रेणीच्या प्रवाशांसाठी भाडेवाढ लागू झाली आहे. कमाल भाडे प्रति किलोमीटर 2 पैशांनी वाढेल असे रेल्वेने सांगितले आहे. जनरल नॉन-एसी च्या स्लीपर क्लास आणि फर्स्ट क्लासचे भाडे प्रति किलोमीटर 50 पैशांनी वाढवण्यात आले आहे. तर मेल आणि एक्सप्रेस नॉन-एसी गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर 1 पैशाने वाढेल. याशिवाय, एसी क्लासमध्ये प्रति किलोमीटर 2 पैशांनी वाढ झाली आहे. म्हणजेच यामुळे सर्वसामान्यांना अधिक पैसे खर्च करावे लागणार असून त्यांचा खिसा अधिक खाली होणार आहे.