#DeepVeer पती रणवीरसोबत नववधू दीपिका माहेरी रवाना
नुकतेच विवाहबंधनात अडकलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यावरचा शुभेच्छांचा वर्षाव अजूनही काही थांबण्याचं नाव घेत नाहीय...
बंगळुरू आणि मुंबई येथे त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं असून, ही जोडी नुकतीच बंगळुरूला रवाना झाली आहे.
२१ नोव्हेंबर रोजी दीपिकाच्या माहेरी अर्थात बंगळुरूमध्ये रिसेप्शन पार पडणार आहे.
तर बंगळुरूनंतर २८ नोव्हेंबर रोजी मुंबईत रणवीर सिंहच्या कुटुंबीयांगकडून हॉटेल ग्रॅन्ड हयातमध्ये रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलंय.
पेस्टल, व्हाईट आणि क्रिम रंगाच्या ब्राईट रंगांच्या मॅचिंगमध्ये हे जोडप्याचं रुप अधिक खुलून दिसत होतं.
मंगळवारी सकाळीच या नवविवाहित जोडीला मुंबई विमानतळावर पाहण्यात आलं. यावेळी सुंदर अशा अनारकली ड्रेसमध्ये नववधू रुपातील दीपिकाचं सौंदर्य आणखीन खुलून आलं होतं.
रणवीरही पांढऱ्या रंग्याच्या कुर्ता, पायजम्यात रुबाबदार दिसत होता. या पेहरावावर फ्लॉरल प्रिंट असणारं जॅकेटही त्याला शोभून दिसत होतं. मुख्य म्हणजे या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता.
हिंदी कलाविश्वात अत्यंत कमी वेळात प्रसिद्धी मिळवलेल्या या जोडीच्या आयुष्यात आलेलं हे वळण सध्या त्यांच्यावर आनंदाची उधळण करत आहे.
इटलीत पार पडलेल्या विवाह सोहळ्यासाठी दीपिका आणि रणवीरने फार कमी पाहुण्यांना आमंत्रण दिलं होतं. पण, लग्नाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्वागत सोहळ्यात म्हणजेच रिसेप्शनमध्ये तसं चित्र दिसणार नाही.
विमानतळावर दिसलेल्या रणवीर - दीपिकाचा आनंद लपता लपत नव्हता... (सौ. योगेन शाह)