जूनचा महिना सर्वसामान्य नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. जूनच्या पहिल्या तारखेलाच नियमांत काही बदल होणार आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
एलपीजी गॅसच्या किंमतीपासून ते एफडी व्याजदरापर्यंत 1 जूनपासून काही महत्त्वाचे आणि मोठे बदल होऊ शकतात. तर जाणून घेऊयात 1 जूनपासून कोणते बदल होऊ शकतात.
जूनचा महिना सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 1 जूनपासून कोणते बदल होणार याचा आढावा घेऊयात.
जूनमध्ये EPFO च्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. सरकार EPFO चे नवीन व्हर्जन 3.0 लाँच करणार आहे. ज्यातून पीएफ काढणे, डाटा अपडेट आणि क्लेम करणे सोप्पं होणार आहे. तसंच, एटीएममधूनही पैसे काढता येणार आहेत.
जूनपासून क्रेडिट कार्ड युजर्ससाठीदेखील महत्त्वाचे बदल होणार आहेत. ऑटो-डेबिट फेल झाल्यास 2% पेनल्टी, यूटिलिटी बिल आणि फ्यूल खर्चवर एक्स्ट्रा चार्ज, इंटरनॅशनल ट्रान्सेक्शनवर अतिरिक्त शुल्क आणि रिवॉर्ड पाँइट्सची व्यवस्थेतही कपात होऊ शकते.
जून 2025 ला एटीएम ट्रान्सेक्शन नियमांत काही बदल होण्याची शक्यता होऊ शकते. यामध्ये एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कात वाढ समाविष्ट आहे. याचा अर्थ असा की एटीएममधून पैसे काढण्यासाठी नवीन शुल्क लागू होईल.
दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किमतीत महत्त्वाचे बदल होतात. अशा परिस्थितीत, यावेळी देखील 1 जून 2025 रोजी गॅस सिलिंडरची किंमत कमी किंवा जास्त असू शकते. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केल्याने त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे.
जून रोजी एफडी व्याजदर कमी किंवा वाढवता येतील. बहुतेक बँका 6.5% ते 7.5% दरम्यान व्याज देत असल्या तरी, जूनपासून हे दर देखील कमी होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.