T20 World Cup 2024 : जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे.
अशातच आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप खेळणार आहे. तर दुसरीकडे व्हाईस कॅप्टन कोण असेल, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नाही.
अशातच आता ऋषभ पंतच नाव समोर येताना दिसतंय. टीम इंडियाचा टी-ट्वेंटी उपकर्णधार हार्दिक पांड्या याला नारळ मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई इंडियन्सची आयपीएलमधील कामगिरी अन् हार्दिकची कॅप्टन्सी पाहता. त्याला नारळ दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर त्याला गोलंदाजीमध्ये देखील खास कामगिरी करता आली नाहीये.
ऋषभ पंतचा संघ दिल्ली कॅपिटल्स यंदा चांगली कामगिरी करतोय. ऋषभच्या नेतृत्वात दिल्लीने 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे ऋषभवर विश्वास दाखवला जाऊ शकतो.
विकेटकिपर म्हणून देखील ऋषभ पंतच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त आहे. रोहित शर्मा आपल्या लाडक्या खेळाडूवर विश्वास दाखवू शकतो.
एकीकडे युवा आक्रमक खेळाडू संघात येण्यासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे जुने खेळाडू देखील उत्तम कामगिरी करतायेत. त्यामुळे आता नेमकं कोणाला संघात घ्यावं? असा मोठा प्रश्न बीसीसीआयसमोर आहे.
यंदाचा आयपीएल हंगाम खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या बदलाकडे घेऊन चाललाय. त्यामुळे आता वर्ल्ड कपच्या दृष्टीने देखील संघ मजबुतीसाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे.