Nitesh Tiwari Ramayan Star Cast: आदिपुरुष' चित्रपटामधील कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न या चित्रपटामधून केला जाणार आहे. विशेष म्हणजे VFX ऐवजी या चित्रपटामध्ये भावनांना अधिक महत्त्व दिलं जाईल असं सांगितलं जात आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही निश्चित झाली आहे. जाणून घेऊयात याचसंदर्भात सविस्तर माहिती...
'आदिपुरुष' चित्रपट पाहून तुम्ही निराश झाला असाल तर तुमची निराशा दूर करणारी मोठी अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या याचसंदर्भात सविस्तर माहिती...
'दंगल' चित्रपटामधून नीतेश तिवारी यांनी आपली गोष्ट सांगण्याची पद्धत वेगळी असल्याचं अधोरेखित केलं. भावनांशी सुरेख मेळ साधत गोष्ट सादर करण्याची कला नीतेश तिवारी यांच्याकडे दिग्दर्शक म्हणून आहे.
त्यामुळेच 'रामायणा'वर आधारित नीतेश तिवारी यांचा चित्रपट हा सुद्धा वेगळ्या धाटणीचा असेल असं सांगितलं जात आहे. 'आदिपुरुष' चित्रपटामधील कमतरता या चित्रपटामधून भरुन काढल्या जातील असं सांगितलं जात आहे. या चित्रपटाची निर्मिती मधु मंटेना करणार आहेत. मागील काही दिवसांपासून या चित्रपटाच्या प्री प्रोडक्शनचं काम सुरु आहे.
नीतेश तिवारी आपल्या चित्रपटांच्या आधी विषयाचा फार अभ्यास करतात. 'पिंकव्हिला'ने दिलेल्या वृत्तानुसार नीतेश यांची टीम या चित्रपटावर मागील बऱ्याच काळापासून काम करत आहे. चित्रपटाची ब्लू प्रिंट तयार झाली आहे.
ऑस्कर पटकावणाऱ्या डीएनईजी चित्रपट कंपनीला व्हीएफएक्सचं काम दिलं जाणार आहे. चित्रपटाच्या व्हिज्युएल्स इतकेच महत्त्वं कथेतील भावनांना देण्याचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट अधिक आपला वाटावा असा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे.
नीतेश तिवारी यांच्या या ड्रीम प्रोजेक्टमध्ये प्रमुख भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे.
नीतेश तिवारी यांच्या या चित्रपटाचं चित्रिकरण 2024 च्या फेब्रवारी महिन्यापासून सुरु होणार आहे.
सध्या रणबीर कपूर संदीप रेडी वांगा यांच्या 'अॅनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल सारखी तगडी स्टारकास्ट 'अॅनिमल' चित्रपटामध्ये आहे.
रणबीरचा 'अॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
'अॅनिमल' रिलीज झाल्यानंतर 2 महिन्यांचा ब्रेक घेऊन रणबीर नीतेश तिवारींच्या रामायणावर आधारित चित्रपटातील 'राम' ही भूमिका साकारणार आहे.
नीतेश तिवारींच्या या चित्रपटाची चर्चा सुरु झाली तेव्हा ऑनस्क्रीन रियल लाइफ कपल दिसेल असं म्हटलं जात होतं.
म्हणजेच रणबीर रामाची भूमिका साकारेल तर सीतेची भूमिका आलिया भट साकारेल असं म्हटलं जात होतं.
मात्र असं नसून आलिया सीतेची भूमिका साकारणार नाही.
नीतेश तिवारी यांनी आपल्या चित्रपटामध्ये सीतेची भूमिका साकारण्यासाठी दाक्षिणात्य अभिनेत्री सई पल्लवीची निवड केली आहे.
सई पल्लवी ही तिच्या लूक्सबरोबरच भूमिकांसाठीही केवळ दक्षिण भारतात नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे.
सई पल्लवीच नीतेश तिवारी यांच्या रामायणामध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे.
मागील बऱ्याच काळापासून नीतेश तिवारींच्या या ड्रीम प्रोजेक्टमध्ये 'केजीएफ' फेम यश हा रावणाची भूमिका साकारेल असं म्हटलं जात आहे.
मात्र यश आणि नीतेश तिवारींच्या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसने यासंदर्भातील वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.
असं असलं तरी यशने नीतेश तिवारींच्या या चित्रपटासाठी होकार दिल्याचं समजतं. यश या चित्रपटाचं शुटींग 2024 च्या जुलै महिन्यामध्ये करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.