Devendra Fadnavis and Uddhav Thackeray Attend NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) उद्घाटन शुक्रवारी मुंबईत झाले. यावेळी कलावंत, धार्मिक गुरु, क्रीडा व व्यावसायिक जगतातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी यांनी उद्घाटन समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बॉलिवूड, हॉलीवूड, क्रीडा आणि राजकारणाशी संबंधित अनेक नामवंत व्यक्ती दिसल्या. यासोबतच महाराष्ट्राच्या दोन्ही माजी मिसेस मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे नृत्य आणि सौंदर्य पाहून बॉलीवूड कलाकार नक्कीच गोंधळले असतील. अमृता फडणवीस आणि रश्मी ठाकरे यांचा मराठमोळा लूक पाहून तुम्ही थक्क व्हाल...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या हलक्या रंगाच्या सॅटिन साडीत दिसल्या. या अबोली रंगाच्या सिल्क साडीवर गुलाबी आणि हिरव्या रंगात फुलांचा प्रिंट रेखाटण्यात आल्या होत्या. आणि पदरला गोंडे लावण्यात आले होते जे अप्रतिम सुंदर दिसत होते.
यावर अमृता फडणवीस यांनी अबोली साडीवर साजेसा असा पिंक शेड मेकअपही केला होता. डेवी फाऊंडेशन, पिंक लिपस्टिक, ब्लश आणि आयशॅडोमुळे हा गोड गुलाबी लुक आणखीनच खुलून आला होता व गालावरील लाजेची लाली वाढवत होता.
यावर अमृता फडणवीस यांनी अबोली साडीवर साजेसा असा पिंक शेड मेकअपही केला होता. डेवी फाऊंडेशन, पिंक लिपस्टिक, ब्लश आणि आयशॅडोमुळे हा गोड गुलाबी लुक आणखीनच खुलून आला होता व गालावरील लाजेची लाली वाढवत होता.
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या या कार्यक्रमात सायंकाळ अधिक सुरमयी बवण्यासाठी रश्मी ठाकरे फिरत्या रंगाच्या गोल्डन कांजीवरम साडीत दिसून आल्या. या साडीवर गोल्डन-सिल्वर कॉम्बिनेशनी अगदी हलकीशी फुलाफुलांची डिझाईन रेखाटली होती.
रश्मी ठाकरे यांनी अतिशय साधा मेकअप व ज्वेलरी परिधान केली होती. कपाळावरची नाजूकशी लाल टिकली, मरून बांगड्या, टेम्पल ज्वेलरी आणि कानातील फुलांनी या लुकला चार चॉंद लावले. शिवाय रेड लिपस्टिक आणि हातातील साडीला मॅचिंग गोल्डन पर्सने लक्ष वेधून घेतले.