kim jong un vladimir putin meeting : जवळपास आठवड्याभराच्या मुक्कामानंतर किम जोंग उत्तर कोरियात परतले. या दौऱ्यात त्यांनी पुतीन यांच्यासोबत 5 तासांची बैठकही घेतली.
किम जोंग रशियाहून परतले ही बाबही संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरली. कारण आपल्या या उत्तर कोरियातील मित्रासाठी पुतिन यांनी काही भेटवस्तूंची व्यवस्था केली होती.
रेल्वे प्रवास करत उत्तर कोरियात परतणाऱ्या किम जोंग यांच्यासाठी पुतिन यांनी भेट म्हणून बुलेटप्रूफ जॅकेट, ड्रोन दिले आणि पाहणारे पाहतच राहिले.
इथं पुतिन यांनी मित्रासाठी चौकटीबाहेरच्या भेटवस्तू निवडल्या आणि तिथं पाश्चिमात्य देशांच्या चिंतेत भर पडली.
रशियातील स्थानिक वृत्तसंस्थेनुसार किम जोंग यांना रशियातून पूर्वीय क्षेत्रातील गवर्नरनं ड्रोन आणि बुलेटप्रूफ जॅकेटचा सेट भेट म्हणून दिला. ज्यामुळं छाती, खांदा, मान आणि कंबरेला संरक्षण मिळतं.
किम जोंग यांना भेट म्हणून मिळालेल्या ड्रोनमध्ये 5 कामिकेज ड्रोन, एक जेरेनियम -25 एयरक्राफ्ट टाइफ टोही ड्रोनचा समावेश आहे.
रशियातून किम जोंग यांना कपड्यांची एक खास जोडीही भेट स्वरुपात देण्यात आली आहे. थर्मल इमेजिंग कॅमेरांची नजर चुकवण्यासाठी हे कपडे जगाचं लक्ष वेधतात.
किम जोंग यांनी रशियातून निघताक्षणी त्यांना दिमाखदार सोहळ्यात निरोप देण्यात आला. जिथं रेड कार्पेट समारंभ, गार्ड ऑफ ऑनरची व्यवस्था होती. एका खास रेल्वेनं ते उत्तर कोरियाच्या दिशेनं रवाना झाले.