Suryakumar Yadav's KKR captaincy offer : मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याला आयपीएलमधून एका संघाच्या कर्णधारपदाची ऑफर आली आहे.
टीम इंडियाचा टी-ट्वेंटी फॉरमॅटचा कॅप्टन सूर्यकुमार यादव टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सूर्याच्या एका कॅचने फायनल सामन्याचं पारडं फिरलं होतं.
सूर्यकुमार यादवला याच कॅचचं भलंमोठं बक्षिस मिळालं. हार्दिक पांड्याला डच्चू देऊन सूर्याची कॅप्टन्सीपदी वर्णी लागली होती. अशातच आता सूर्यकुमार यादवला आणखी एक गुड न्यूज मिळाली आहे.
सूर्यकुमार यादवला एका संघाने थेट कॅप्टन्सीची ऑफर दिल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. त्यामुळे आता सूर्याच्या निर्णयावर सर्वांचं लक्ष लागलंय.
सूर्याला ऑफर देणारी टीम मुंबई इंडियन्स नसून कोलकाता नाईट रायडर्स आहे. सूर्यकुमार आणि केकेआरचं खास बॉन्ड देखील आहे. सूर्याने आयपीएल डेब्यू केकेआरसाठीच केला होता.
दरम्यान, मुंबई इंडियन्स सूर्याला सोडण्यासाठी तयार होणार का? हा देखील मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे श्रेयस अय्यर कॅप्टन्सी देखील धोक्यात असल्याची शक्यता वर्तविती जातीये.