बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी त्यांच्या डेब्यू चित्रपटातूनच लोकप्रियता मिळवली. अशाच या 8 अभिनेत्री आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकताच आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं. पाहूयात या अभिनेत्री कोण आहेत?
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री पहिल्या चित्रपटातूनच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. अनित पड्डापासून दीपिका पदुकोणपर्यंत सर्वांनी पहिल्याच चित्रपटातून आपली छाप सोडली. आजही या अभिनेत्रींपैकी काही इंडस्ट्रीत टॉपवर आहेत, तर काही नव्या उंची गाठण्याच्या तयारीत आहेत.
अनित पड्डा सध्या तिच्या डेब्यू चित्रपट 'सैयारा'मुळे चर्चेत आहे. पदार्पणातच तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. या चित्रपटाआधी अनितने 'सलाम वेंकी' चित्रपट, नेटफ्लिक्सवरील 'बिग गर्ल्स डोन्ट क्राय' मालिका आणि अनेक जाहिरातींमध्ये काम केलं होतं. तिच्या पहिल्याच चित्रपटामुळे तिला मिळालेला प्रतिसाद पाहता, आगामी काळात ती बॉलिवूडमधील एक महत्त्वाचं नाव ठरू शकते अशी अपेक्षा आहे.
2007 मध्ये शाहरुख खानसोबतच्या'ओम शांती ओम'मधून दीपिकाने बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली. या चित्रपटानेच तिला घराघरात लोकप्रिय केलं आणि तिला लगेच स्टारडम मिळालं. पुढे तिने 'चेन्नई एक्सप्रेस', 'ये जवानी है दिवानी', 'पद्मावत', 'पठाण' यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आज दीपिका जागतिक पातळीवर ओळखली जाणारी भारतीय अभिनेत्री आहे.
नितांशीने 2024 च्या चर्चित चित्रपट 'लपता लेडीज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने ग्रामीण मुलीची भूमिका इतक्या नैसर्गिक पद्धतीने साकारली की तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. या चित्रपटानंतर तिला नवे प्रोजेक्ट्स मिळण्यास सुरुवात झाली असून ती बॉलिवूडमधील उद्योन्मुख अभिनेत्री मानली जाते.
प्रतिभा रंतानेही 'लपता लेडीज'मधून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भारावून टाकलं. चित्रपटातील भावनिक आणि साध्या भूमिकेला मिळालेल्या प्रतिसादामुळे तिची वेगळी ओळख तयार झाली. याआधी प्रतिभाने काही मालिकांमध्येही काम केलं होतं, मात्र या चित्रपटामुळे ती विशेष चर्चेत आली.
अनुष्काने 2008 मध्ये आलेल्या 'रब ने बना दी जोडी' चित्रपटातून शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटानंतर तिला लगेचच मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळू लागले. पुढे तिने 'बँड बाजा बारात', 'सुलतान', 'ए दिल है मुश्किल', 'पीके' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत भूमिका साकारल्या. आज अनुष्का बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींबरोबरच निर्मात्यांपैकी एक आहे.
क्रिती सेननने 2014 मध्ये टायगर श्रॉफसोबतच्या 'हिरोपंती'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आणि पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळवला. त्यानंतर तिने 'दिलवाले', 'मिमी', 'बरेली की बर्फी', 'क्रु' यांसारख्या चित्रपटांत भूमिका करून आपली वेगळी ओळख तयार केली. 'मिमी'साठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यामुळे ती इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
मेधा शंकरने विक्रांत मेस्सीच्या '12वी फेल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपली झलक दाखवली. या चित्रपटात तिच्या साधेपणाचं आणि सहज अभिनयाचं खूप कौतुक झालं. पहिल्याच चित्रपटातून तिला मिळालेलं यश पाहता, ती लवकरच मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये झळकण्याची शक्यता आहे.
अमीषा पटेलचा 'कहो ना प्यार है' हा चित्रपट कोणाला माहित नाही? त्या चित्रपटातील गाण्यांनी आणि तिच्या अभिनयाने सगळ्यांनाच वेड लावलं होतं. पण तुम्हाला माहित आहे का, हा अमीषा पटेलचा पहिलाच चित्रपट होता? या चित्रपटातून ती रातोरात प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर तिला अनेक चित्रपटांची ऑफर्स मिळू लागल्या. अमीषा पटेल आजही बॉलिवूडमध्ये नव-नवे प्रोजेक्ट्स घेऊन येत असते.