PHOTOS

युपीच्या 'फुलेरा'त नाही तर 'या' गावात झालंय Panchayat Season 3 चं शुटिंग, पाहा Photos

Panchayat Season 3 : सर्वांना प्रतिक्षा असलेला पंचायत सीझन 3 अखेर रिलीज झाला आहे. गावाकडचं वातावरण साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवणाऱ्या या सिरीजला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. (Panchayat Web Series)

Advertisement
1/7
फुलेरा नाही महोड़िया
फुलेरा नाही महोड़िया

वेब सीरिजमध्ये यूपीचे फुलेरा गाव दाखवण्यात आलं आहे. परंतू प्रत्यक्षात हे गाव मध्यप्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील महोड़िया आहे. 

2/7
पंचायच सिरीज
पंचायच सिरीज

पंचायत वेब सीरिजचे संपूर्ण शूटिंग महोड़िया गावात झालं. पंचायच सिरीज शुट करण्यासाठी संपूर्ण टीम या गावात 2 महिने रहायला होती. 

 

3/7
शुटींगची ठिकाणं
शुटींगची ठिकाणं

गावाच्या पाण्याची टाकी, सरपंचाचं घर एवढंच नाही तर पंचायत भवन देखील याच गावात आहे. गावातील नागरिकांनी देखील शुटींगमध्ये सहभाग नोंदवला आहे.

4/7
महोड़िया
महोड़िया

पंचायत सिरीजमध्ये दाखवण्यात आलेलं महोड़िया गाव पाहण्यासाठी अनेक ठिकाणहून लोक या गावात येत आहेत. अनेकजण फोटो काढण्यासाठी येथे येतात.

5/7
गावकऱ्यांची खंत
गावकऱ्यांची खंत

पंचायत सिरीजचे तिन्ही पार्ट याच गावात शुट झालेत. मात्र, सिरीजमध्ये गावाचं नाव घेयला पाहिजे होतं, अशी खंत लोक आजही व्यक्त करतात.

6/7
गावाकडची आठवण
गावाकडची आठवण

सचिवजी म्हणजेच अभिषेक त्रिपाठी याचं ट्रान्फर थांबवण्यासाठी सुरू झालेली खटपट पंचायतला अधिक रंग देण्यास सुरूवात होते. सिरीज पाहून तुम्हालाही नक्कीच गावाकडची आठवण येईल.

7/7
मुख्य भूमिका
मुख्य भूमिका

जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, चंदन रॉय, फैजल मलिक,दुर्गेश कुमार आणि सान्वीका यांच्या या मुख्य भूमिका आहेत. या सीरिजसाठी जितेंद्रने प्रत्येक एपिसोडसाठी सत्तर हजार रुपये मानधन घेतलं आहे.





Read More