PHOTOS

'आता गायीही रॅम्प वॉक करणार?'; मॉडेलकडूनच सोनाक्षी सिन्हाला ट्रोल, सतत झाली बॉडी शेमिंगचा शिकार, तरीही...

Sonakshi Sinha Birthday Special: बॉलिवूडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2 जून 1987 रोजी जन्मलेली सोनाक्षी सिन्हा ही अभिनेता आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची मुलगी आहे. सोनाक्षीच्या कारकिर्दीच्या सुरुवातील तिला अनेकांच्या टीका आणि बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला.

Advertisement
1/8

सोनाक्षी सिन्हा ही एक अशी अभिनेत्री आहे जिने आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध केलं आहे. विशेष म्हणजे तिला कायमच अनेकांच्या टीका आणि बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. हे एक असे संकट होते ज्याचा तिला दीर्घकाळ त्रास झाला. मात्र, सोनाक्षीने नेहमीच त्या टीकांना योग्य उत्तर दिले आणि स्वतःला पुन्हा पुन्हा सिद्ध केलं.

 

2/8

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी असलेली सोनाक्षी तिच्या हटके अंदाजामुळे ओळखली जाते. अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉडी शेमिंग ही समस्या तिला चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वीपासूनच भेडसावत होती. तिच्या शरीरयष्टीमुळे अनेकांनी तिला टोमणे मारले. मात्र, ही टीका तिच्या अभिनय प्रवासातही कायम राहिली.

 

3/8

एका मुलाखतीदरम्यान सोनाक्षीने स्वतः बॉडी शेमिंगबाबतचा अनुभव शेअर केला होता. 'बीएफएफ विथ व्होग' या नेहा धुपियाच्या शोमध्ये तिने सांगितले की, एकदा ती रॅम्प वॉकसाठी जात असताना एका प्रसिद्ध मॉडेलनं तिची थट्टा करत म्हटलं होतं- 'हे काय, आता गायीही रॅम्पवर चालतील का?' हा अपमानकारक अनुभव तिच्यासाठी अत्यंत वेदनादायक होता.

4/8

त्यावेळी सोनाक्षी अजून चित्रपट सृष्टीत आली नव्हती. ती फॅशन डिझायनिंग करत होती आणि रॅम्पवर चालण्याचा तिचा पहिलाच अनुभव होता. पण त्या प्रसंगाने तिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ केलं. घरी परतल्यानंतर तिला तिची काकू दिसली. तिने लगेचच आपल्या काकूला मिठी मारून रडू लागली आणि स्वतःला प्रश्न विचारत राहिली, 'देवाने मला असं का बनवलं?'

 

5/8

पण यानंतर सोनाक्षीने स्वतःवर मेहनत घेण्याचा निर्णय घेतला. तिने फिटनेसकडे लक्ष दिलं आणि काही काळातच तब्बल 30 किलो वजन कमी केलं. त्यानंतर तिला सलमान खानच्या 'दबंग' चित्रपटात संधी मिळाली आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला.

6/8

या चित्रपटानंतर तिला अनेक चित्रपट मिळू लागले. मात्र, यश मिळाल्यानंतरही सोनाक्षीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. तिच्या शरीररचनेबद्दल आजही काहीजण टीका करतात. मात्र, आता ती अशा कमेंट्सकडे दुर्लक्ष करते आणि तिच्या कामावर लक्ष केंद्रित करते.

 

7/8

आज सोनाक्षी सिन्हा तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनाक्षीने 23 जून 2024 रोजी अभिनेता झहीर इक्बालशी लग्न केले. या लग्नाबद्दल खूप वाद झाला कारण झहीर मुस्लिम आहे आणि सोशल मीडियावरील ट्रोलर्सनी सोनाक्षीला खूप ट्रोल केले. रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षीचे भाऊ लव आणि कुश देखील या लग्नाच्या विरोधात होते. असे असूनही, सोनाक्षीने सर्व टीकेकडे दुर्लक्ष करून झहीरशी लग्न केले आणि आता ते दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहेत. 

8/8

सोनाक्षी सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि ती बॉडी पॉझिटिव्हिटीचे समर्थन करते. ती नेहमीच ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देते. अभिनयाव्यतिरिक्त, सोनाक्षीला चित्रकला आणि गायनाचीही आवड आहे. तिने एक हिंदी गाणं स्वतः देखील गायलं आहेत.





Read More