New feature: यूट्यूब आता सर्वात लोकप्रिय ऍपपैकी एक आहे. आता यूट्यूबने 'यूट्यूब शॉपिंग' हा नवीन फिचर लाँन्च केला आहे.
देशात सर्वात जास्त वापरला जाणारा ऍप म्हणजे यूट्यूब. त्यातच आता यूट्यूबने नवीन फिचर लाँन्च केला आहे. यूट्यूबने या नवीन फिचरला यूट्यूब शॉपिंग असे नाव दिले आहे. यूट्यूबने फ्लिपकार्ट आणि मिंत्रा या दोघांसोबत भागीदारीत हा फिचर सुरू केला आहे.
उत्पादनांच्या विक्रीवर क्रिएटर्स कमिशन देऊन, क्रिएटर्सच्या मदतीने प्रोडक्ट लिस्ट करण्यात येणार आहे. तसेच व्हिडिओ लिंक केला जाईल.
जर तुमच्याकडे यूट्यूब चॅनेल असेल आणि त्यावर एखादे उत्पादन सूचीबद्ध असेल आणि त्या सूचीमधून उत्पादन विकले गेले असेल तर तुम्हाला कमिशन मिळेल.
देशातले सर्व लोक यूट्यूब च्या या नवीन शॉपिंग फीचरचा लाभ घेऊ शकतील. त्यामुळे लोकांच्या उत्पन्नातही मोठी वाढ होऊ शकेन.
यूट्यूब हे फिचर निर्मात्यांना त्यांच्या व्हिडिओंमध्ये उत्पादनांना टॅग करण्याची लवचिकता देते. त्याचबरोबर लोकांना पैसे कमवायचे साधनही मिळते.
या फीचरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आधी यूट्यूब ओपन करावे लागेल .यानंतर तुम्हाला YouTube Studio वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला डाव्या बाजूला Earn चा पर्याय मिळेल. यानंतर तुम्हाला प्रोग्राम ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.त्यानंतर तुम्हाला Jion Now या पर्यायावर क्लिक करून नियम आणि शर्ती या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर या नवीन फीचरचा पर्याय तेथे मिळेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)