PHOTOS

Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांना मिळत नाही खरं प्रेम! जगापासून राहतात तुटलेले...

Love Life Numerology Prediction: अंकशास्त्रानुसार मानवीच्या जन्मतारखेनुसार त्याचा भविष्याचे वेध, त्याचा स्वभाव आणि त्याचा आयुष्यावर कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो हे सांगितलं जातं. अंकशास्त्रानुसार आज कुठल्या जन्मतारखेच्या लोकांना खरं प्रेम मिळत नाही, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

 

 

 

Advertisement
1/8

प्रेम ही जीवनातील सर्वात सुंदर भावना असून प्रेमात पडलेला व्यक्तील स्वर्ग गवसतो, असं म्हटलं जातं. पण प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात प्रेम मिळतं असं नाही. खरं प्रेम तर मिळणं आजच्या जगात एवढं सोप नाही. अंकशास्त्रात एका विशेष मूलांक असलेल्या व्यक्तीला आयुष्यात कधीही खरं प्रेम मिळत नाही. त्याच्या प्रेमाच्या मार्गात अनेक काटे असतात. 

 

2/8

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म 7, 16 किंवा 25 तारखेला झालेला असतो त्यांचा मूलांक हा 7 असतो. त्यांचा स्वामी हा केतू असून या लोकांना प्रेम जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.  

 

3/8

अंकशास्त्रानुसार 7 मूलांक असलेला लोकांचा स्वभाव कसा असतो तो पाहूयात. या लोकांचा स्वभाव हा खूप भावनिक असतो. त्यांच्या भावना ते प्रकट होऊ देत नाही, ही त्यांची खासियत असते. त्यांच्या भावना ते हृदयात दडून ठेवतात, त्यामुळे अनेकदा त्यांच्याबद्दल गैरसमज होतात. 

 

4/8

या मूलांक असलेल्या लोकांना एकटं राहायला आवडतं. हे लोक अनेक वेळा जगापासून तुटल्यासारखे वाटतं. अनेक वेळा त्यांचा जोडीदारही त्यांच्यापासून दुरावतो. 

 

5/8

या मूलांकाच्या जोडीदाराबद्दल बोलायचं झालं तर, त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप आवडत नाही. बऱ्याचदा ही गोष्ट नात्यात दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. 

 

6/8

पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 7 मूलांकाचे लोक अत्यंत रोमँटिक असतात पण प्रेमाच्या बाबतीत ते थोडे अपरिपक्व असतात आणि खूप प्रयत्न करूनही त्यांना खरे प्रेम सहज आयुष्यात मिळत नाही. 

7/8

या मूलांकाचे लोक इतरांना ओळखण्यात तरबेज असतात. ते सहज इतरांचा स्वभाव ओळखतात. शिवाय ते त्यांच्या नात्याबद्दल खूप प्रामाणिक असतात. 

 

8/8

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.) 





Read More