बॉलिवूडमधील 39 वर्षीय अभिनेत्रीने सांगितले की तिला चित्रपटात बिकिनी परिधान करणे सोयीचे नव्हते. यासाठी तिने मोठं पाऊल उचलावे लागले होते. कोण आहे ही अभिनेत्री?
अनेकदा चित्रपट निर्मात्यांच्या मागणीनुसार अभिनेत्रींना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून असे करावे लागते जे त्यांना कधीच कम्फर्टेबल वाटत नसते.
असाच एक प्रकार 39 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला आहे. ज्यामध्ये तिला चित्रपटात बिकिनी परिधान करणे सोयीचे नव्हते. मात्र, निर्मात्याच्या मागणीनुसार तिने मोठा निर्णय घेतला होता.
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा ही तिच्या साधेपणा आणि स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. अभिनेत्रीने नेहमीच चित्रपटसृष्टीतील तिच्या संघर्षाबद्दल उघडपणे मत व्यक्त केलं आहे.
नुसरत भरुचाने अनेकदा सांगितले की चित्रपटांमधील तिचा प्रवास सोपा नव्हता. 'प्यार का पंचनामा' आणि 'प्यार का पंचनामा 2' या चित्रपटांनी नुसरत भरूचाला जबरदस्त ओळख दिली.
हाउटरफ्लाईशी बोलताना अभिनेत्री म्हणाली की, लव रंजनच्या 'प्यार का पंचनामा' चित्रपटात पहिल्यांदाच बिकिनी परिधान करताना तिला कम्फर्टेबल वाटलं नाही. तिने सांगितले की, यापूर्वी कधीही तिने बिकिनी परिधान केली नव्हती. त्यामुळे तिला वाटले की जर तिने चित्रपटात बिकिनी परिधान केली तर तिला कॅमेऱ्यासमोर अस्वस्थ वाटेल.
तिने दिग्दर्शकांना सांगितले की, ती बिकिनीमध्ये अस्वस्थ आणि विचित्र दिसेल. अभिनेत्रीने तिच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी तिने ओळखीच्या लोकांच्या नजरेपासून दूर अशा ठिकाणी जावे लागले जिथे तिला बिकिनी घालणे सोयीचे वाटेल.
मुंबईत तुम्ही बिकिनी घालून फिरू शकत नाही, म्हणून अभिनेत्रीने परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. तिथे तिने 3 दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त बिकिनी घातली. त्यानंतर ती तिच्यासाठी सामान्य गोष्ट बनली. ती म्हणते की पहिल्या दिवसानंतर, ती विसरली की तिने बिकिनी घातली आहे आणि तिला फक्त असे वाटले की ती एक महिला आहे आणि बिकिनी घालणे तिच्यासाठी एक सामान्य गोष्ट आहे.