यश दासगुप्ता सोबत वाढलेली जवळीक यामुळे नुसरत जहाँच्या विवाहित जीवनात अडचणी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.
आपल्या वैयक्तीक आयुष्यावर बोलण्यास नुसरत जहाँने नकार दिला आहे.
एक अभिनेत्री असल्याने तिच्या कामाबद्दल बोललं जावं. माझ्या खाजगी आयुष्यात काय चाललं आहे हे बोलण्यासाठी मला कोणाची बंदी नाही.
२०१९ मध्ये टीएमसीकडून निवडणूक लढवून ती खासदार झाली. बिझनसमन निखील जैन सोबत विवाह केल्यानंतर ती चर्चेत आली होती.
विवाहानंतर तिचे अनेक फोटो समोर आले होते. ज्यामध्ये ती हिंदू आणि मुस्लीम सण साजरा करताना दिसत असे.
नुसरतच्या विवाहानंतर तिला अनेक धमक्या देखील आल्या होत्या. पण तेव्हा ती आपल्या भूमिकेवर ठाम होती.