PHOTOS

Nysa Devgan Bold Photos : मित्रांच्या मिठीत अजय देवगन, काजोलची लेक बेधुंद; 19 व्या वर्षी हिचं काय सुरुये?

Nysa Devgan Viral Photos : साधारण 90 च्या दशकातील बॉलिवूड कलाकारांची मुलं आता हे कलाजगत गाजवत आहेत. यातील अनेकांनी तर चित्रपटांच्या दुनियेत पदार्पणही केलं नाही, पण तरीही त्यांच्या नावाच्या चर्चा मात्र आतापासूनच सुरु झाल्या आहेत. याच चर्चांमध्ये येणारं एक नाव म्हणजे न्यासा देवगन. 

Advertisement
1/5

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) आणि अभिनेत्री काजोल (Kajol) यांची ही मोठी मुलगी. आईवडिलांच्या लोकप्रियतेच्या जोरावर सध्या न्यासा बरीच प्रसिद्धीझोतात येताना दिसत आहे. 

2/5

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या तिच्या फोटोंमध्येच आता काही नव्या फोटोंचाही समावेश झाला आहे. या फोटोंमध्ये ती मित्रमंडळींसमवेत बेधुंद होऊन पार्टीत धम्माल करताना दिसतेय. 

3/5

फोटोंमध्ये न्यासासोबत तिचा खास मित्र ओरहान अवत्रामणीसुद्धा दिसत आहे. कोणा एका पार्टीला गेलं असताना न्यासानं यावेळी काळ्या रंगाच्या डीप नेकलाईन असणाऱ्या एका ड्रेसला पसंती दिली होती. 

 

4/5

न्यासाचा हा लूक फॅशनच्या हिशोबानं सुरेख होता. पण, वयाच्या 19 व्या वर्षी तिचं इतकं स्टायलिश असणं काही नेटकऱ्यांना मात्र खटकलं. 

5/5

हिचं काय सुरुये?, पार्टीच करते मग शिकणार कधी? असे काही खोचक प्रश्न तिच्या या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर नेटकऱ्यांनी केले आहेत. (सर्व छायाचित्र- सोशल मीडिया)

 





Read More