PHOTOS

चंद्रावर ऑलिम्पिक खेळांचं आयोजन केल्यास कसं असेल चित्र? पाहा AI Photo

Olympics On Moon AI pictures : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे तर, चंद्र मानवाच्या आणखी जवळ आल्याचीच अनुभूती होत आहे. 

 

Advertisement
1/7
गमतीचा भाग
गमतीचा भाग

गमतीचा भाग म्हणजे, याच तंत्रज्ञानाच्या मदतीनं चंद्रावर मानवी वावर सुरु झाल्यास नेमकं कसं चित्र असेल याचीही एक झलक समोर आली आहे. 

 

2/7
मानवी जीवन
मानवी जीवन

मानवी जीवनच नव्हे, तर सध्या चर्चेत असणाऱ्या ऑलिम्पिक खेळांचं आयोजन थेट चंद्रावर केल्याच नेमकी काय परिस्थिती असेल, खेळाडू कसे दिसतील? याचीही कमाल झलक AI फोटोंच्या माध्यमातून नुकतीच समोर आली आहे. 

3/7
चंद्रावर एक मोठं मैदान
चंद्रावर एक मोठं मैदान

एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या छायाचित्रांमध्ये चंद्रावर एक मोठं मैदान तयार करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय या मैदानाच्या आजुबाजूचा परिसरही पाहता येत आहे. 

4/7
खेळाडू
खेळाडू

चंद्रावरच्या या अनोख्या ऑलिम्पिकमध्ये खेळाडू विविध खेळांमध्ये सहभाग घेत असून आकर्षणाची बाब म्हणजे तिथं गुरूत्वाकर्षणातच झेपा घेताना दिसत आहेत. 

5/7
चंद्रावर ऑलिम्पिक
चंद्रावर ऑलिम्पिक

पुढील कैक वर्षांमध्ये प्रत्यक्ष चंद्रावर ऑलिम्पिक खेळांचं आयोजन केलं जाणं जवळपास कठीण. पण, एायच्या माध्यमातून मात्र तेसुद्धा साध्य झाल्यामुळं अनेकांच्याच भुवया कुतूहलानं उंचावल्या आहेत. 

6/7
शक्यता
शक्यता

 जगभरातील विविध अंतराळ संशोधन संस्थांच्या माध्यमातून अवकाश आणि तत्सम मुद्द्यांवर अभ्यास केला जात असून, चंद्रावरील जीवसृष्टी आणि तिथं मानवी वावर या साऱ्या शक्यता तपासल्या जात आहेत. 

7/7
कल्पनाशक्तीला चालना
कल्पनाशक्तीला चालना

प्रत्यक्षात या संशोधनासाठी मोठा काळ जाणार असून, एआयचे हे फोटो फक्त आणि फक्त कल्पनाशक्तीलाच चालना देत आहेत असं म्हणणं गैर ठरणार नाही. 

 





Read More