Viral News : एक नाही दोन नाही तब्बल 9 बायकांचा एकुलता एक नवरा त्यांना खूष ठेवण्यासाठी खाय डाएट घेतो. त्यासोबत तो काही जबरदस्त कामंही करतो.
9 बायका असणे हा विनोद नाही, यासाठी शरीरात ताकदही तेवढी असणे गरजेची असते. त्याचा सर्व बायका खूष आहेत. या बायकांचा नवरा ब्राझीलचा मॉडेल आहे. तो शरीराची ताकद वाढवण्यासाठी काय करतो पाहूयात.
आर्थर ओ उर्सो (Arthur O Urso) असं या ब्राझीलच्या मॉडेलच नाव आहे. TOI च्या रिपोर्टनुसार, त्याला एक नाही तर तब्बल नऊ बायका आहेत. पण सत्य हे आहे की, नऊ बायका सांभाळण्यासाठी तंदुरुस्त शरीर असणे अतिशय गरजेचे आहे. त्याचे इन्स्टाग्रामवरील फोटो पाहून स्पष्टपणे कळते की, हा माणूस त्याचा फिटनेसची खूप काळजी घेतो.
शरीराची शक्ती आणि ताकद वाढवण्यात वर्कआउट सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते यात कुठलीही शंका नाही. हा माणूस जिममध्ये नियमितपणे व्यायाम करणे कधीही चुकवत नाही. ज्यामध्ये हेवी वेट ट्रेनिंग, कार्डिओ आणि स्ट्रेचिंग यांसारख्या व्यायाम तो करतो.
पोहणे हा सर्वोत्तम व्यायाम हा मॉडेल मानतो. नियमित पोहण्यामुळे वजन कमी होण्यास, तग धरण्याची क्षमता वाढण्यास, स्नायूंमध्ये टोन आणण्यास, सहनशक्ती वाढण्यास खूप फायदेशीर ठरतं असं तो म्हणतो. कदाचित याच कारणामुळे आर्थरला पोहणे फार आवडते.
जिममध्ये वर्कआउट करुन आल्यावर तो प्रोटीन घेतो. साहजिकच व्यायाम करताना शरीर थकते आणि स्नायू तुटतात. प्रथिने स्नायूंची दुरुस्ती आणि स्नायूंची वाढ वाढवण्याचे प्रोटीन खूप फायदेशीर ठरते.
आर्थर ओ. उर्सो त्याच्या सर्व पत्नींसह एकाच छताखाली गुनागोविंदाने राहतात. एवढंच नाही त्याने त्याच्या सर्व बायकांना झोपण्यासाठी एक मास्टर बेड बनवलाय.
तो मध्यम कार्बोहायड्रेट्ससह उच्च फायबर आणि उच्च प्रथिनेयुक्त आहार घेतो. अंड्याचा पांढरा भाग हा त्याचा प्रथिनांचा मुख्य स्रोत असून याशिवाय तो चरबीयुक्त मासे, लाल मांस आणि चीज खातो. फायबर मिळविण्यासाठी, त्याला बोकचॉय, लेट्यूस आणि अनेक प्रकारची फळे यासारख्या भाज्या आवडतात.