रोमान्स आणि बोल्ड सीन्सने भरलेले आणि ओटीटीवर उपलब्ध असणारे 6 चित्रपट तुम्ही मोफत एकट्याने पाहू शकता.
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा क्रेझ प्रचंड वाढला आहे. सिनेमागृहात जाण्याऐवजी अनेकजण घरातच बसून ओटीटीवर चित्रपटांचा आनंद घेतात. मात्र काही चित्रपट असे आहेत, जे कुटुंबासोबत पाहणे टाळलेच पाहिजे.
या चित्रपटांमध्ये इंटिमेट आणि बोल्ड सीन भरपूर असून थरारक कथा देखील आहेत. अशाच काही एकट्याने पाहण्यास योग्य अशा ओटीटीवर उपलब्ध असलेल्या चित्रपटांची यादी आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.
जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू याचा मुख्य भूमिका असलेला ‘जिस्म’ हा चित्रपट रोमान्स आणि बोल्ड सीनने भरलेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित सक्सेना यांनी केलं असून महेश भट्ट यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. हा चित्रपट तुम्ही Zee5 वर पाहू शकता.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘जिद’ हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला. करणवीर शर्मा, मन्नारा चोप्रा आणि श्रद्धा दास यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. चित्रपटात बोल्ड सीनसोबतच थरारक कथा आहे. YouTube वर हा चित्रपट तुम्ही मोफत पाहू शकता.
अजय बहल दिग्दर्शित ‘बीए पास’ हा एक जबरदस्त रोमँटिक-थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटामध्ये अनेक इंटिमेट सीन असून कथा देखील खूप आकर्षक आहे. हा चित्रपट तुम्ही YouTube वर मोफत पाहू शकता.
डिनो मोरिया, इमरान हाशमी आणि उदिता गोस्वामी याचा मुख्य भूमिका असलेला 'अक्सर' हा चित्रपट बोल्ड सीन्सने भरलेला आहे. चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना शेवटपर्यंत बांधून ठेवते. हा चित्रपट तुम्ही YouTube वर मोफत पाहू शकता.
इमरान हाशमी आणि मल्लिका शेरावत याचा मुख्य भूमिका असलेला 'मर्डर' हा चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केलेला बोल्ड थ्रिलर चित्रपट आहे. तुम्ही हा चित्रपट YouTube वर मोफत पाहू शकता.
'वन नाईट स्टैंड' हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला आहे. रोमांस आणि बोल्डनेसने भरलेला हा चित्रपट आहे. सुरुवात खूप प्रभावी आहे. मात्र शेवट फारसा दमदार नाही. हा चित्रपट तुम्ही YouTube वर उपलब्ध आहे. तो मोफत तुम्ही पाहू शकता.